CM Eknath Shinde : ‘२६ जुलै’च्या पुराची आठवण काढत मुख्यमंत्री शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

महिला मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापूरमधील पुराबाबत विविध उपाययोजना केल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की; कोल्हापूरातील पुराची समस्या कायमची संपावी, इचलकरंजीकरांना पुराचा त्रास होऊ नये, यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून ३२०० कोटींचा प्रकल्प करण्यात येत आहे."

123
CM Eknath Shinde : उबाठा रंग बदलणारा सरडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे टीकास्त्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज म्हणजेच शुक्रवार ८ मार्च रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी हातकणंगले तालुक्यातील कोरोचीमध्ये महिला मेळावा त्यांच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. “२६ जुलैच्या मुंबईतील पुरात आपल्या वडिलांना घरातच सोडून पंचतारांकित हॉटेलमध्ये जाणारे लोक” असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

(हेही वाचा – Sunil Gavaskar : धरमशालेत साजरा झाला सुनील गावसकर यांच्या १०,००० कसोटी धावांचा वाढदिवस)

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे ?

महिला मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कोल्हापूरमधील पुराबाबत विविध उपाययोजना केल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की; कोल्हापूरातील पुराची समस्या कायमची संपावी, इचलकरंजीकरांना पुराचा त्रास होऊ नये, यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून ३२०० कोटींचा प्रकल्प करण्यात येत आहे. या प्रकल्पातून पुराचा कायमस्वरुपी त्रास दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच पंचगंगा प्रदूषणाची समस्या मिटवण्यासाठी ७५० कोटींची योजना हाती घेतल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

(हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आरक्षणानुसार भरती, शैक्षणिक दाखले कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील – मुंबई उच्च न्यायालय)

मुंबईतील पुरात आपल्या वडिलांना घरातच सोडून पंचतारांकित हॉटेलमध्ये जाणारे लोक :

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. मुंबईमधील पूरपरिस्थितीची आठवण करून देत असताना ते म्हणाले, “माणुसकी, प्रेम म्हणजे काय असतं, हे कोल्हापूरकरांकडून शिकावं. मागे एकदा कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीची पाहणी करत असताना मी बोटीने एका गावात गेलो होते. तिथे घराच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी साचलेले दिसले. त्या घरातील कुटुंबाने दुसऱ्या मजल्यावर आपल्यासह गुरा-ढोरांनाही स्वतःबरोबर ठेवलं होतं. हे प्रेम कुठं आणि २६ जुलैच्या मुंबईतील पुरात आपल्या वडिलांना घरातच सोडून पंचतारांकित हॉटेलमध्ये जाणारे लोक कुठे? असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. (CM Eknath Shinde)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.