Atal Setu वर कारवाईचा धडाका; वेगाची मर्यादा ओलांडणाऱ्या २ हजार चालकांवर कारवाई

सेतूवर कितीही फॉग असला तरी ऑटोमॅटिक यंत्रणेच्या मदतीने हिट जनरेट होते आणि कॅमेराला वेगाची मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांचे फोटो काढण्यासह वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांचे फोटो काढता येतात.

142
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतू (Atal Setu) वर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर वाहतूक विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. वेगाची मर्यादा ओलांडली म्हणून आतापर्यंत नवी मुंबई प्रादेशिक परिवहन विभागाकडून २ हजार २०० चालकांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून ४ लाख ४० हजार रुपये दंड वसूल केला आहे.

अटल सेतूवर थर्मल सेन्सर कॅमेरे बसविले

अटल सेतूवर (Atal Setu) मध्येच वाहने थांबविली म्हणून १४६ वाहनांवर कारवाई केली आहे. पूलावर मध्येच वाहन थांबवून सेल्फी काढण्यात येणाऱ्या कारवाईचाही तपशील आहे. पुलावर वाहन थांबवल्याप्रकरणी २ गुन्हे आणि स्थानिक खटले शिवडी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आले आहेत, असे वाहतूक पोलीनी सांगितले. अटल सेतूवर (Atal Setu) थर्मल सेन्सर कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे सेतूवर कितीही फॉग असला तरी ऑटोमॅटिक यंत्रणेच्या मदतीने हिट जनरेट होते आणि कॅमेराला वेगाची मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांचे फोटो काढण्यासह वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांचे फोटो काढता येतात.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.