Nepal मध्ये हिंदू राष्ट्राच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर

132

नेपाळमध्ये (Nepal) हिंदु राष्ट्राची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. राजधानी काठमांडूच्या रस्त्यावर शेकडो आंदोलक यासाठी घोषणा देत आहेत. ते देशात पुन्हा राजेशाही लागू करण्याची मागणी करत आहेत. बुधवारी शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले. ते पंतप्रधान कार्यालय आणि इतर सरकारी कार्यालयांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी त्यांची पोलिसांशी झटापटही झाली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बांबूच्या लाठीचार्ज, अश्रुधुराचा आणि पाण्याच्या तोफांचा वापर केला.

(हेही वाचा IIT Bombay च्या विद्यार्थ्यांकडून श्रीराम-सीताचे विडंबन; सीताच्या तोंडी अश्लील संवाद; IIT गंभीर दखल घेणार; पण…)

भ्रष्टाचाराला आळा घालण्याची मागणी 

नेपाळच्या (Nepal) राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने होत होती. यावेळी लोकांनी आम्हाला आमचा देश आणि राजा आमच्या जीवापेक्षा जास्त प्रिय आहे. प्रजासत्ताक रद्द करून देशात राजेशाही परत आली पाहिजे, अशा घोषणा दिल्या. नेपाळ 2007 मध्ये धर्मनिरपेक्ष देश बनला, 2008 मध्ये राजेशाही संपली, यापूर्वी प्रजातंत्र पक्षाने फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान कार्यालयाला 40 कलमी निवेदनही पाठवले होते. यामध्ये भ्रष्टाचाराला आळा घालण्याची मागणी करण्यात आली. खरे तर नेपाळमध्ये (Nepal) 2006 मध्ये राजेशाहीविरुद्धचे बंड अधिक तीव्र झाले. अनेक आठवड्यांच्या निदर्शनांनंतर तत्कालीन राजा ज्ञानेंद्र यांना त्याग करून सर्व सत्ता संसदेकडे सोपवावी लागली. 2007 मध्ये नेपाळला हिंदू धर्मनिरपेक्ष देश म्हणून घोषित करण्यात आले. पुढील वर्षी राजेशाही अधिकृतपणे संपुष्टात आली आणि निवडणुका झाल्या. यासह 240 वर्षांपासून सुरू असलेली राजेशाही संपुष्टात आली. तेव्हापासून नेपाळमध्ये (Nepal) 13 सरकारे आहेत. नेपाळ गेल्या काही काळापासून राजकीयदृष्ट्या अस्थिर आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.