पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये लोकशाहीविरोधी प्रचार; निवडणुकीत NOTA निवडण्याचे आवाहन

258

सध्या देशात लोकसभा निवडणूक सुरु आहे. प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. अशा वेळी पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये मात्र चुकीचा प्रकार दिसून येत आहे. याठिकाणी काही विद्यार्थ्यांनी पोस्टर लावले आहेत. ज्यामध्ये या निवडणुकीत NOTA हा पर्याय निवडावा, असे आवाहन करण्यात आले.

पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेत लोकशाही विरोधी पोस्टर लावण्यात आले. याविषयी पुणेकरांमध्ये प्रचंड संताप उसळला असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने त्या पोस्टर विरोधात संतप्त निदर्शने केली आहेत. देशात लोकशाही प्रणालीनुसार निवडणुका होत नसून तुम्ही त्याचा निषेध नोंदवण्यासाठी ‘NOTA’ पर्यायाला मतदान करा, असे आवाहन या पोस्टरमध्ये केले होते. परंतु त्या पोस्टरवर कुणाचेही नाव घालण्याची हिंमत लिबरल्सनी दाखवली नव्हती. लोकशाही विरोधी पोस्टर झळकवणाऱ्यांविरोधात पोलिसांनी ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने करून परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोखले इन्स्टिट्यूटच्या प्रशासनाचा निषेधही केला.

(हेही वाचा IIT Bombay च्या विद्यार्थ्यांकडून श्रीराम-सीताचे विडंबन; सीताच्या तोंडी अश्लील संवाद; IIT गंभीर दखल घेणार; पण…)

सध्या संपूर्ण देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकांचे वातावरण असताना निवडणूक आयोग आणि अन्य संस्था जास्तीत जास्त मतदान व्हावे. ‘NOTA’ या पर्यायाचा वापर कमीत कमी व्हावा यासाठी जागरूकता निर्माण करत आहे. त्या अंतर्गत निवडणूक गोखले इन्स्टिट्यूटच्या प्रशासनाने डेमोक्रसी वॉलचा बॅनर लावला होता. यावर विद्यार्थ्यांनी लोकशाहीला पूरक मतदान करावे यासाठी मजकूर लिहिण्यासाठी जागा होती. पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई करावी म्हणून महाविद्यालयाबाहेर निदर्शने केली. त्याचबरोबर या दोषी विद्यार्थ्यांना पाठीशी प्रशासनाचा निषेध व्यक्त करत असताना संबंधित पोलीस ठाणे आणि निवडणूक आयोग मध्ये गोखले इन्स्टिट्यूट च्या प्रशासनावर देखील कारवाई व्हावी याकरिता निवेदन दिली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.