नरेंद्र मोदी २०२४ला पराभूत होणार का? काय म्हणाले गडकरी?

89

भाजपने आतापासूनच २०२४च्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मोर्चेबांधणीवर जोर दिला आहे. मात्र त्याचवेळी भाजपाला पराभूत करण्यासाठी देशभरातील विरोधक एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यात विरोधक यशस्वी होतील का, यावर मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वक्तव्य सर्वांचे लक्ष केंद्रित करणारे आहे.

‘क्रिकेट, बिझनेस आणि राजकारणात काहीही होऊ शकते, मात्र चांगल्या कामामुळे जनता आमच्यासोबत आहे, मोदी सरकारने प्रत्येक क्षेत्रात चांगले काम केले आहे, देशात झालेला बदल हा सरकारच्या कामाचा पुरावा आहे, असे मंत्री नितीन गडकरी म्हणाले. 2014 पासून आजपर्यंत सरकार आल्यावर 50 लाख कोटींची कामे केली आहे. अजूनही काम सुरू आहे. मात्र आमच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. ज्या उणिवा राहिल्या आहेत त्या सहकार्याने आणि समन्वयाने सोडवल्या जातात त्यामुळे सर्व कामे सहज होतात. माझ्याकडे असलेल्या खात्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही, संपूर्णपणे पारदर्शक अशी व्यवस्था केली आहे. आर्थिक ऑडिट हे अत्यंत महत्त्वाचे असले तरी कामाची क्षमताही त्यापेक्षा महत्त्वाची आहे. म्हणजे ऑडिट हे खूप महत्वाचे आहे आणि त्याच वेळी परफॉर्मन्स ऑडिट देखील जास्त महत्वाचे आहे, असेही गडकरी म्हणाले.

(हेही वाचा खलिस्तान्यांना खुद्द शिखांनीच दिले सडेतोड उत्तर; हातात तिरंगा घेऊन… )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.