Chandrasekhar Bawankule: शरद पवारांना सीतामाईंचा कळवळा म्हणजे ढोंगच; बावनकुळेंचा पलटवार

104
Chandrasekhar Bawankule: शरद पवारांना सीतामाईंचा कळवळा म्हणजे ढोंगच; बावनकुळेंचा पलटवार
Chandrasekhar Bawankule: शरद पवारांना सीतामाईंचा कळवळा म्हणजे ढोंगच; बावनकुळेंचा पलटवार

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच आहे. असं बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांनी रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती का नाही असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर बावनकुळेंनी पवारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. (Chandrasekhar Bawankule)

सीतामाईंबद्दल कळवळा कसा?

घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात त्यांना सीतामाईंबद्दल कळवळा कसा? राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान आहेत, याची आधी माहिती घ्यावी, असा सल्लाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांचा शरद पवारांना दिला आहे. (Chandrasekhar Bawankule)

पवारांनी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) ट्विट करत म्हणाले, “राम मंदिरात सीतामाईंची मूर्ती का नाही? असा जावईशोध शरद पवार यांनी लावला आहे. एरवी हेच पवार (Sharad Pawar) मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत आपण नास्तिक असल्याची शेखी मिरवत असतात. शरद पवारांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान आहेत पण पवारांना फक्त राजकारण करण्यात रस आहे. बरं जे शरद पवार (Sharad Pawar) निवडणुकीसाठी घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात त्यांना आज सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच म्हणावा लागेल. ” अशा शब्दांत बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule) शरद पवारांना सुनावलं आहे. (Chandrasekhar Bawankule)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.