उद्धव ठाकरेंचा वाढदिवस ‘देशद्रोही दिन’ म्हणून साजरा करा – नितेश राणे

मुख्यमंत्री पदाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे हिंदुत्वाशी गद्दारी करून उद्धव ठाकरेंनी द्रोह केला आहे, अशी टीका राणे यांनी मंगळवारी (20 जून) पत्रकार परिषदेत केली.

158
उद्धव ठाकरेंचा वाढदिवस 'देशद्रोही दिन' म्हणून साजरा करा - नितेश राणे

२७ जुलै हा उद्धव ठाकरेंचा वाढदिवस ‘देशद्रोही दिन’ म्हणून साजरा करावा, अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी युनाटेड नेशनकडे ट्वीटरद्वारे केली आहे. मुख्यमंत्री पदाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे हिंदुत्वाशी गद्दारी करून उद्धव ठाकरेंनी द्रोह केला आहे, अशी टीका राणे यांनी मंगळवारी (20 जून) पत्रकार परिषदेत केली.

नितेश राणे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी 2014 ते 2019 पर्यंत सख्ख्या भावासारखे उद्धव ठाकरेंना सांभाळले. पण, त्यांनी त्याची कदर केली नाही. जी भाषा संजय राऊतची, तिच भाषा उद्धव ठाकरेंची. चांगले विचार देण्यासाठी वर्धापन दिन साजरा केला जातो. पण, उद्धव ठाकरे घाणेरड्या वृत्तीचा माणूस आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठा ‘अवली’ उद्धव ठाकरे आणि त्याचा मुलगा ‘कवली’, असा टोलाही राणे यांनी लगावला.

(हेही वाचा – महाराष्ट्र मिशन ड्रोन प्रकल्पाला तत्वतः मान्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)

परवाच्या सभेत त्यांनी थयथयाट केला. त्यामागील करण म्हणजे कॅगच्या अहवालानुसार होणारी कारवाई. ठाकरे आणि पाटणकरचे कपडे फाटले जाणार आहेत. त्यामुळे सरकारी भाचा सरदेसाई मुख्यमंत्री शिंदेंच्या मागेमागे फिरतोय. पाटणकर, सरदेसाईचे जेलमध्ये जायचे दिवस जवळ आले आहेत. मुंबई पालिकेतील मस्ती बाहेर येणार, संज्याचा मालक जेल मध्ये जाणार. 33 देशांत ठाकरेंचे पैसे नंदकिशोर चतुर्वेदीने लपवले आहेत, असा गौप्यस्फोटही नितेश राणे यांनी केला.

मविआच्या काळात हिंदू ‘खतरे में’

अडीच वर्षे महाविकास आघाडीच्या काळात धर्मांतर, लव्ह जिहाद, लँड जिहादच्या माध्यमातून हिंदू ‘खतरे में’ आले आहेत. संजय राऊत तुझ्या मालकाने हिंदूंशी गद्दारी केली, म्हणून आम्हाला हिंदू जन आक्रोश मोर्चा काढावा लागतो. मुंबईत बांगलादेशी रोहिंगे वाढले, बेहराम पाडा-मालवणी भागात त्यांना वीज, पाणी ठाकरेंच्या सत्ता काळात मुंबई पालिकेने पुरवले, असा आरोपही नितेश राणे यांनी केला.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.