BMC Elections : मुंबईत शरद पवारांची राष्ट्र्वादी काँग्रेस राहिली कुठे? मुंबई अध्यक्षासह तीन माजी नगरसेवकांनी सोडली साथ

155
BMC Elections : मुंबईत शरद पवारांची राष्ट्र्वादी काँग्रेस राहिली कुठे? मुंबई अध्यक्षासह तीन माजी नगरसेवकांनी सोडली साथ
BMC Elections : मुंबईत शरद पवारांची राष्ट्र्वादी काँग्रेस राहिली कुठे? मुंबई अध्यक्षासह तीन माजी नगरसेवकांनी सोडली साथ

मुंबईतील शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव (Rakhi Jadhav) यांच्यासह महापालिकेचे दोन माजी गटनेते तसेच विक्रोळीतील माजी नगरसेविका यांनी पक्षाची साथ सोडून भाजपा (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) साथ धरली आहे. त्यामुळे मुंबईतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्वच आता संपुष्टात आले आहे.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर मुंबई अध्यक्षपदाची धुरा मुंबई महापालिका गटनेत्या असलेल्या राखी जाधव (Rakhi Jadhav) यांच्यावर सोपवली होती. पण अखेरच्या क्षणाला उमदेवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याने त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपाच्या वतीने घाटकोपर (Ghatkopar) प्रभाग १३१ मधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. राष्ट्र्वादी काँग्रेसच्या राखी जाधव या घाटकोपर मधील प्रभाग क्रमांक १३१ मधून निवडून आल्या होत्या आणि भाजपाचे भालचंद्र शिरसाट यांचा पराभव केला होता. परंतु राष्ट्र्वादी काँग्रेस आता उबाठा आणि मनसेसोबत नसल्याने अखेर घाटकोपरमधून निवडून येणे कठिण असल्याने राखी जाधव यांनी भाजपाची साथ पकडली आहे. राखी जाधव यांनी सोमवारी सकाळी स्थानिक आमदार पराग शाह यांची भेट घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. राखी जाधव सन २००२ पासून नगरसेविका आहे. सलग तिन वेळा त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. तसेच सन २०१७ मध्ये निवडून आल्यानंतर पक्षाच्या महापालिका गटनेत्या म्हणून निवड झाली होती. (BMC Elections)

(हेही वाचा – Bhandup Bus Accident : भांडुप स्टेशनबाहेर बेस्ट बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले; ४ पादचाऱ्यांचा मृत्यू, १४ जखमी)

माजी महापालिका गटनेते धनंजय पिसाळ, बबन कनावजे, मनिषा रहाटे आणि माजी महापालिका गटनेत्या राखी जाधव या शरद पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसमध्ये कायम राहिले होते. या चौघांच्या माध्यमातून मुंबईत शरद पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसचे अस्तित्व टिकून होते. परंतु हे तिन्ही चारही माजी नगरसेवकांनी आता भाजपा आणि अजित पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. (BMC Elections)

तर राष्ट्र्वादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक ११९मधील मनिषा रहाटे (Manisha Rahate) यांनी अजित पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर मुंबई महापालिकेेचे माजी गटनेते धनंजय पिसाळ हे मागील २००२ पासून निवडून येत आहेत. कधी ते स्वत: तर कधी त्यांची पत्नी भारती पिसाळ या निवडून येत होत्या, त्यांनीही आता अजित पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बबन कनावजे (Baban Kanavje) यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. कनावजे हेही यापूर्वी मुंबई महापालिकेत पक्षाचे गटनेते होते. सध्या ते शरद पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसमध्ये होते. परंतु त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे परळ भागातील पक्षाची ताकदही संपली गेली आहे. (BMC Elections)

यापूर्वी राष्ट्र्वादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका डॉ सईदा खान, माजी नगरसेवक कप्तान मलिक यांनी राष्ट्र्वादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, तर धनश्री भरडकर, रेश्मा बानो खान आणि सोफिया बानू यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

वांद्र्यात राष्ट्र्वादी काँग्रेसचे पदाधिकारी नाराजी, शिवसेनेच्या मार्गावर

वांद्रे पूर्व तालुक्यातील राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षाला राम राम करत तालुकाध्यक्ष नितीन गायकवाड यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे नितीन गायकवाड हे पक्षाच्या पदाचा राजीनामा देवून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचीही जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे. (BMC Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.