खाते वाटपावरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच

राष्ट्रवादीला 'ही' खाती मिळाल्यास भाजप-शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता

120
शिवसेना-भाजपाच्या मंत्र्यांवर मंत्रीपदांची टांगती तलवार?

रविवारी २ जुलै रोजी राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीतून काही आमदारांना घेऊन अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. राज्यातल्या सत्तानाट्याच्या या सगळ्या घडामोडीनंतर सगळी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. एकिकडे अजित पवार गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. अजितदादा गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिवसेनेला कीती मंत्रिपद मिळणार, याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. दरम्यान, सोमवार १० जुलै रोजी रात्री उशिरा मंत्रीमंडळ विस्तार व खाती वाटप याबाबत शिंदे-फडणवीस-पवार यांच्यात दिड तास बैठक पार पडली.

राष्ट्रवादीमुळं शिवसेना – भाजपाला कमी मंत्रीपद मिळणार

राष्ट्रवादीला काही महत्त्वाची खाती मिळणार असल्यामुळं याचा फटका शिवसेना व भाजपाला बसणार आहे. तसेच ज्यांच्याकडे अधिक खाती आहेत, त्यांच्याकडे एक किंवा दोनच खाती राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अशातच मंत्रीपदाची आस लावून बसलेल्या शिवसेनेच्या नेत्यांना मंत्रीपद मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेतील काही नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुन उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

(हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयाने ‘त्या’ १२ आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली)

अर्थ खाते अजित पवार यांच्याकडे जाऊ शकते ?

सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १३ खाती आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ७ खाती आहेत, यात त्यांच्याकडे अर्थ व गृहखाते आहे. यातून अर्थ खाते हे अजित पवारांकडे जाण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका असल्यानं लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आधी शेवटचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. या अर्थसंकल्पातून जनतेसाठी मोठ्या घोषणा व जनतेला अमिष दाखवण्याची शेवटची संधी आहे. तसेच सध्या शिवसेना व भाजपाकडे नऊ मंत्रिपदं आहेत, अनेक मंत्र्यांच्या खात्यामध्ये फेरबदल होणार आहेत. राष्ट्रवादीने सहकार, महसूल यांसह काही महत्त्वाच्या खात्यांवर दावा केला आहे. त्याबाबत मात्र तीव्र मतभेद झाले आहेत. त्यामुळे खातेवाटपावरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

दरम्यान, खातेवाटपाचा तिढा सुटल्याशिवाय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याचे समजते आहे. त्यामुळे हा विस्तार आणखी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

… तर मग जय महाराष्ट्र करू – गोगावले

जुलै १७ रोजी सुरू होणाऱ्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी आमचा शपथविधी होईल असा दावा शिवसेनेतील आमदार करत आहेत. पण तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही तर काय भूमिका असेल? या प्रश्नाचं उत्तर देताना प्रतोद भरत गोगावले म्हणाले, “आम्ही आमदार चर्चा करून ठरवणार आहोत आणि त्यांना तसं कळवणारही आहे. त्यामुळे त्यांनाही सोपं जाईल. नाहीतर मग आम्ही जय महाराष्ट्र करू.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.