BJP : भाजपकडून आमदारांच्या चार वर्षांच्या कामकाजाची मार्कशीट तयार

अमित शहा दोन दिवसीय पुणे दौऱ्यात घेणार पदाधिकाऱ्यांची शाळा

85
BJP : भाजपकडून आमदारांच्या चार वर्षांच्या कामकाजाची मार्कशीट तयार

मिशन लोकसभा आणि विधानसभेसाठी भाजप (BJP) कामाला लागली आहे. भाजप जोरदार मोर्चेबांधणी करत आहे. प्रत्येक मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रीत केलं आहे. आमदारांना मतदारसंघात कामे करण्यास सांगितलं आहे. नागरिकांच्या समस्या सोडवतानाच मतदारसंघ बांधणीवरही लक्ष देण्यास सांगितलं आहे. कोणत्याही परिस्थिती राज्यात पुन्हा सत्ता आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. राज्यातील १४५ जागांवर भाजपने लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप कामाला लागली आहे.

(हेही वाचा – : … तर इंटरनेट शिवाय पाहू शकाल थेट मोबाईलवर लाईव्ह टीव्ही चॅनल)

त्यातच केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा (BJP) हे शनिवारी (५ ऑगस्ट) पुणे दौर्‍यावर येत आहेत. रविवारी (६ ऑगस्ट) ते चिंचवड येथे होणार्‍या बहुराज्यीय सहकार संस्थांसाठीच्या पोर्टलचे उद्घाटन करणार आहेत. यानिमित्त सहकार क्षेत्रातील मान्यवरांसह काही महत्त्वपूर्ण राजकीय गाठीभेटी व विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील बहुराज्यीय सहकारी संस्थांचे पदाधिकारी (मल्टिस्टेट) आणि साखर महासंघ व सहकारी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींसह सुमारे दीड हजार सदस्य या वेळी उपस्थित राहतील.

लोकसभेच्या “मिशन ४५” (BJP) यावर काम करत असताना अमित शहा खुद्द भाजपच्या (BJP) काही बड्या नेत्यांबरोबर या दौऱ्या दरम्यान चर्चा देखील करणार आहे. भाजपने स्वतः काही अंतर्गत सर्वे देखील राज्यात केले आहेत. त्यानुसार राज्याचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर भाजपमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने झाडाझडती सुरू केली आहे. त्याचा एक भाग म्हणून भाजप सर्व आमदारांना थेट त्यांचं रिपोर्ट कार्डच देणार आहे. जे आमदार कच्चे आहेत, त्यांची कान उघाडणी केली जाणार आहे. भाजपने सर्व आमदारांना येत्या १८ ऑगस्ट रोजी मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. भाजपच्या (BJP) मुंबईतील प्रदेश कार्यालयात ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीत ज्या आमदारांचा सर्वे मध्ये रिपोर्ट चांगला आला नाही किंवा काठावर पास असलेले आमदार यांच्या बद्दल कठोर निर्णय घेणार असल्याचे भाजपच्या सूत्रांकडून कळते. तसेच अशा आमदारांच्या विधानसभा क्षेत्रात पर्यायी उमेदवार देखील तयार करण्याची चाचणी सुरू असल्याचे बोलले जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.