“फुकटचं घावलं अन् गाव सारं धावलं…”, पडळकरांचा महाविकास आघाडीवर निशाणा

128

भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर सडकून टीका केली. ‘फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं’ अशी विजय वडेट्टीवारांनी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केली असल्याची टीका पडळकर यांनी केली आहे. यासह पडळकर यांनी ओबीसी आयोगासंदर्भात एका व्हिडिओ सादर करून आपलं मत व्यक्त केलं आहे.

काय म्हणाले पडळकर

ओबीसी मंत्री विजय वडेडट्टीवार व अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसती वाहवा मिळवत मागासवर्ग आयोगासाठी ४५० कोटींची घोषणा केली. वास्तवात फक्त साडेचार कोटी दिले. पण ते खर्च करण्याचे आदेश ही आयोगाला मिळाले नाहीत. ओबीसी आयोगाला ना ऑफीस ना पूर्णवेळ सचिव अशी अवस्था आहे. तसंच आयोगाचे संशोधक सोलापूरात आणि आयोग पुण्यात असा विचित्र प्रकार आहे. विजय वडेट्टीवारांनी टक्केवारीसाठी ‘फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं’ अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केली”, असा थेट आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

प्रस्थापितांसाठी केवळ पोपटपंछी

पुढे पडळकरांनी बोलताना सवालही उपस्थितीत केला, ते म्हणाले ओबीसींच्या नावावर मंत्रीपद भूषवतात आणि प्रस्थापितांसाठी पोपटपंछी करतात. आता तर हद्दच झाली उद्याच्या १७ जानेवारीला ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची सुनावणी आहे. आणि त्या करिता उद्धव सरकारने आयोगाला अंतिरम अहवाल मागितला होता. पण आयोगाचे कामच सुरू नाही झाले तर अहवाल कसा देणार?

ओबीसींच्या हक्कावरती डल्ला मारला जाणार

कामाला सुरूवात न झाल्याने दिशाभूल करण्यासाठी लगबगीने वडेट्टीवारांनी तीन महिन्याची मुदत न्यायालयाला मागणार,असे जाहीर केले. याचा अर्थ महाराष्ट्रात येऊ घातलेल्या निवडणूकात ओबीसींना राजकीय आरक्षण राहणार नाही आणि प्रस्थापित ओबीसींच्या राजकीय हक्कावरती डल्ला मारला जाणार म्हणून मी समस्त ओबीसी बांधवांना आव्हान करतो की तुमच्या नावावरती लालदिवा मिळवणारे आणि आपल्यालच फसवणाऱ्या ओबीसी मंत्र्यांना जिथे भेटेल तिथे गाठा आणि जाब विचारा, असा सल्लाही पडळकर यांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.