मिथून चक्रवर्ती, सौरव गांगुली यांना ‘खो’; भाजपने जाहीर केली तीन उमेदवारांची यादी

128
मिथून चक्रवर्ती, सौरव गांगुली यांना 'खो'; भाजपने जाहीर केली तीन उमेदवारांची यादी
मिथून चक्रवर्ती, सौरव गांगुली यांना 'खो'; भाजपने जाहीर केली तीन उमेदवारांची यादी

वंदना बर्वे

भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा तमाम चर्चांना फोल ठरवित राज्यसभेच्या निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची यादी जाहीर केली. राज्यसभेच्या १० जागांसाठी २४ जुलै रोजी निवडणूक होणे आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरूण सिंग यांनी जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रक जारी करून राज्यसभेच्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली. गुजरातमधून बाबूभाई जेसंगभाई देसाई आणि केसरी देवी सिंह जाला यांना मैदानात उतरविले आहे. तर, पश्चिम बंगालमधून अनंत महाराज यांना तिकीट दिले आहे. भाजपने पश्चिम बंगालमधील अनंत महाराज यांना उमेदवारी देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. भाजपच्या उमेदवारीसाठी चित्रपट अभिनेता मिथून चक्रवर्ती किंवा क्रिकेटपटू सौरभ गांगुली यांच्या नावांची खूप चर्चा होती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राजकीय विश्लेषकांना पुन्हा एकदा ४४० व्होल्टचा शॉक दिला.

कोण आहेत अनंत महाराज?

भाजपने बंगालमधून राजवंशी समाजाचे नेते आणि ग्रेटर कूचबिहार चळवळीचे प्रमुख अनंत महाराज यांना आपला उमेदवार बनविला आहे. ते राजवंशी समाजाचे नेते आहेत. ग्रेटर कूचबिहार पीपल्स असोसिएशनचे प्रमुख असून दीर्घकाळापासून वेगळ्या ग्रेटर कूचबिहार राज्याची वकिली करत आहेत. निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या १० जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधील ६, गुजरातमधील ३ आणि गोव्यातील एका जागेसाठी २४ जुलै रोजी मतदान होणार आहे. उल्लेखनीय आहे की यापूर्वी केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

(हेही वाचा – Police : गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली 5 लाखांची लाच)

बाबूभाई देसाई आणि केशरीदेव सिंह झाला कोण होते?

भाजपने गुजरातमधून जाहीर केलेल्या इतर दोन नावांमध्ये बाबूभाई देसाई आणि केशरीदेव सिंग झाला यांच्या नावांचा समावेश आहे. बाबूभाई देसाई यांनी २००७ मध्ये बनासकांठा जिल्ह्यातील कांकेरेज मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिठी येथून आमदार झाले. तर केसरीदेवसिंग झाला हे वांकानेर राज्यातील राजघराण्यातील आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.