Bastar : ‘ऐसा सच जो देश को हिला देगा’; ‘बस्तर’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; डाव्यांच्या हिंसेचा खरा चेहरा येणार समोर?

182

‘द केरळ स्टोरी’ च्या अभूतपूर्व यशानंतर विपुल अमृतलाल शाह निर्मित ‘बस्तर’ हा चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरमध्ये लिहिले आहे, “देशाला हादरवून सोडणारे छुपे सत्य – बस्तर.”

सोशल मिडीया वापरकर्ते हा चित्रपट नक्षलवाद्यांवर आधारित असावा असा अंदाज बांधत आहेत.  कम्युनिस्टही याला नक्षलविरोधी म्हणतील, असा अंदाज बांधून काही सोशल मीडिया वापरकर्ते टोमणे मारत आहेत. काही जण म्हणत आहेत की, वेळ लागला तरी चालेल या चित्रपटाचा दर्जा उत्कृष्ट असावा.

हा चित्रपट येत्या ५ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटात प्रमुख भूमिकेत कोण असणार हे अद्याप समोर आले नाही. लास्ट मंक मीडियाच्या सहकार्याने, सनशाईन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये विखुरलेले जंगल आणि बंदुका दिसत आहेत.

(हेही वाचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते हिंदु जनजागृती समितीचे रमेश शिंदे यांना ‘सांस्कृतिक योद्धा पुरस्कार २०२३’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.