Bangladeshi Infiltrators : कर्नाटकात काँग्रेसच्या राजवटीत बांगलादेशी घुसखोरांना अभय; बेंगळुरूमध्ये चक्क बांगलादेशींसाठी उभारल्या तंबूच्या वस्त्या

इद्रिस आणि साजिद यांनी बांगलादेशातून भारतात प्रवेश केला, बेंगळुरूमध्ये घुसखोरांसाठी तंबूच्या वस्त्या उभारण्यात आली आहे, एनआयएने याचा खुलासा केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत 14 जणांना अटक करण्यात आली आहे.

122

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून राज्यात अनेक चुकीच्या गोष्टी होत आहेत. यात आणखी एका गैरप्रकाराची भर पडली आहे. राज्यात बांगलादेशी घुसखोरांना (Bangladeshi Infiltrators) अभय दिले जात आहे. या प्रकरणी एनआयएने बेंगळुरूमध्ये दोन बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. या लोकांनी पद्धतशीरपणे घुसखोरांसाठी तंबूच्या वस्त्या उभारल्या आहेत. अनेक महिन्यांपासून एनआयएची कारवाई सुरू होती.

एनआयएने बेंगळुरूमध्ये दोन बांगलादेशी घुसखोरांना (Bangladeshi Infiltrators) अटक केली आहे. या लोकांनी पद्धतशीरपणे घुसखोरांसाठी तंबूच्या वस्त्या उभारल्या आहेत. या घुसखोरांनी बेंगळुरूच्या दोन वेगवेगळ्या भागात कचरा प्रक्रिया युनिट उभारले होते. अनेक महिन्यांपासून एनआयएची कारवाई सुरू होती. या टोळीने बांगलादेशींना भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश दिला आणि त्यांच्यासाठी आधारकार्डसारखी सर्व कागदपत्रे बनावट पद्धतीने बनवली, असे एनआयएने म्हटले आहे. एनआयएने बांगलादेशींच्या मानवी तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद साजिद हलदर आणि इद्रिस अशी त्यांची नावे आहेत.

(हेही वाचा Congress : मंदिरांवर ‘झिजिया कर’ लावणारे विधेयक कर्नाटक विधान परिषदेत नामंजूर; काँग्रेस सरकारला धक्का)

आसाम, त्रिपुरा आणि सीमापार तस्करांशी संबंध 

“हलदर आणि इद्रिस दोघेही बेनापोस मार्गे भारतात दाखल झाले होते. यातील हलदरने राममूर्ती नगर, बेंगळुरू येथे ‘जंक कलेक्शन अँड सेपरेशन’ युनिट स्थापन केले होते आणि या ठिकाणी बांगलादेशातून आणलेल्या घुसखोरांना (Bangladeshi Infiltrators) कामावर ठेवले होते. त्याच वेळी, इद्रिसने आनंदपुरा, बंगळुरू येथे असेच एक युनिट स्थापन केले होते आणि भाडेतत्त्वावर जमीन घेऊन तंबूच्या वस्त्या उभ्या केल्या होत्या. त्यात 20 हून अधिक बांगलादेशी कुटुंबे ठेवण्यात आली होती. या कुटुंबांनाही तस्करीच्या माध्यमातून भारतात आणल्याचा संशय आहे, सध्या एनआयए या संपूर्ण नेटवर्कच्या तपास करत आहे. कर्नाटकस्थित काही व्यक्तींचे आसाम, त्रिपुरा आणि सीमापार देशांतील सूत्रधार आणि तस्करांशी संबंध असल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर NIA ने 7 नोव्हेंबर 2023 रोजी गुन्हा दाखल केला होता. या लिंकमुळे भारत-बांगलादेश सीमेवरून भारतात व्यक्तींची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश झाला होता. हे आरोपी बनावट आधारकार्ड बनवून पीडितांना पुरवण्यातही गुंतलेले आढळले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.