Goregaon Filmcity जवळील उंच भिंत कोसळली; 2 जण ठार

152

मुंबईतील गोरगावमधील फिल्मसिटीजवळ (Goregaon Filmcity) उंच भिंत कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे. घटनेनंतर अनेक वेळ मदत आणि बचाव कार्य सुरू होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य केले.

मुंबईतील गोरेगाव परिसरातील फिल्मसिटीजवळ (Goregaon Filmcity) शनिवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली. प्राइम फॉक्स प्रोडक्शनच्या मागे असलेल्या फिल्मसिटी गेट क्रमांक 2 जवळ 60 फूट लांब आणि 20 फूट उंच भिंत कोसळली. फिल्म सिटी परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी हा अपघात झाला. दरम्यान, भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 2 कामगारांचा जागेवरच मृत्यू झाला असून एक कामगार जखमी झाला आहे. जखमी कामगाराला जोगेश्वरीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मृत झालेले दोघेही तरुण हे मजूर म्हणून काम करत होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस मुंबई महानगरपालिकेची टीम घटनास्थळी दाखल झाले आहेत. शिवाय अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावर दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले.

तिघांना काढले बाहेर

दरम्यान, कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्यांखालून तीन जणांना बाहेर काढण्यात आले. यामध्ये 32 वर्षीय सिंतू मंडल, 45 वर्षीय जयदेव बिसवास यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव रात्री उशिरापर्यंत ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.