Assembly Election 2023 Result : चार राज्यांचा निकाल; सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस; राहुल गांधींना ठरवले ‘पनौती’

237

देशात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल (Assembly Election 2023 Result) रविवार, ३ डिसेंबर रोजी जाहीर झाला. त्यामध्ये तीन राज्यांमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, तर केवळ तेलंगणामध्ये भाजपाला यश आले नाही. या निकालाच्या दिवसभरात मात्र नेटकऱ्यांनी चांगलीच मजा घेतली आहे. प्रचाराच्या वेळी क्रिकेट विश्व चषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये गेले होते, तो सामना भारत हरला. त्यावरून राहुल गांधी यांनी ‘पंतप्रधान मोदी पनौती आहेत, ते गेल्यामुळे भारत हरला, अशी टीका केली होती. नेटकऱ्यांनी आता राहुल गांधी यांना त्यांच्या याच शब्दाची आठवण करून देत त्यांना पनौती म्हटले. नेटकऱ्यांनी राहुल गांधींनाच काँग्रेससाठी पनौती सांगत त्यांच्यावर यथेच्छ मिम्स व्हायरल केल्या.

 

 

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.