Assembly Election 2023 Result : आजच्या विजयाने 2024 मधील हॅटट्रिक निश्चित – पंतप्रधान मोदी

Loksabha Election 2024 : केंद्रात मोदींची ही सलग तिसरी सत्ता आहे. 2024 मध्ये पक्ष जिंकल्यास, केंद्रात भाजपची ही हॅटट्रिक असेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

175
Assembly Election 2023 Result : आजच्या विजयाने 2024 मधील हॅटट्रिक निश्चित - पंतप्रधान मोदी
Assembly Election 2023 Result : आजच्या विजयाने 2024 मधील हॅटट्रिक निश्चित - पंतप्रधान मोदी

आजच्या हॅटट्रिकने 2024 च्या (loksabha election 2024) हॅटट्रिकची हमी दिली आहे. केंद्रात मोदींची ही सलग तिसरी सत्ता आहे. 2024 मध्ये पक्ष जिंकल्यास, केंद्रात भाजपची ही हॅटट्रिक असेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. छत्तीसगड (Chhattisgarh), मध्यप्रदेश (Madhya Pradesh) आणि राजस्थान (Rajasthan) या सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. तेलंगाणातही भाजपच्या जागा वाढल्या आहेत. या विजयानंतर दिल्ली येथील भाजप मुख्यालात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) बोलत होते. (Assembly Election 2023 Result)

(हेही वाचा – Assembly Election 2023 Result : चार राज्यांच्या निकालांमुळे लोकसभेच्या ८२ जागांवर भाजपाची मोहर)  

या वेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, ”आमच्या कार्यकर्त्यांचे, भाजप आणि कमल यांच्याप्रती असलेल्या तुमच्या निष्ठेचे मी कौतुक करेन, तुमचे समर्पण अतुलनीय आहे.”

…अन्यथा लोक तुम्हाला सत्तेतून बाहेर काढतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ”हा निवडणूक निकाल काँग्रेससाठी (Congress) आणि त्यांच्या घमंडिया आघाडीसाठीही (india alliance) मोठा धडा आहे. केवळ कुटुंबातील काही सदस्य मंचावर एकत्र येऊन देशाचा विश्वास जिंकू शकत नाहीत. देशातील लोकांची मने जिंकण्यासाठी राष्ट्रीय सेवेची जी भावना असायला हवी, ती घमंडिया आघाडीत नाही. आजचे निकालांनी इतर पक्षांना धडा दिला आहे की, केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजना आणि त्यांच्यासाठी पाठवल्या जाणारा निधी यांच्यामध्ये येऊ नका. अन्यथा लोक तुम्हाला सत्तेतून बाहेर काढतील.”

तेलंगाणाच्या जनतेला आश्वासन 

तेलंगाणातील (telangana) मतांचा टक्का या निवडणुकीत वाढला आहे. त्याविषयी मोदी म्हणाले, ”मी तेलंगणातील जनतेचे आणि तेलंगणातील भाजप कार्यकर्त्यांचे विशेष आभार मानतो. तेलंगणामध्ये प्रत्येक निवडणुकीनुसार भाजपचा आलेख सातत्याने वाढत आहे. मी तेलंगाणाच्या जनतेला आश्वासन देतो की, भाजप तुमच्या सेवेत कोणतीही कसर सोडणार नाही.”

(हेही वाचा – Assembly Election 2023 Result : चारही राज्यांत भाजपचा वाढला जनाधार; कोणत्या राज्यात मतांच्या टक्क्यांत किती झाली वाढ?)

आदिवासी समाजाने काँग्रेसचा सफाया केला

”ज्या काँग्रेसने आदिवासी समाजाला कधीच विचारले नाही, त्या आदिवासी समाजाने काँग्रेसचा सफाया केला. आज हीच भावना आपण मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये पाहिली आहे. या राज्यांमधील आदिवासी जागांवर काँग्रेसची पकड स्पष्ट होती. आदिवासी समाज आज विकासाची आकांक्षा बाळगतो आणि त्यांना विश्वास आहे की, केवळ भाजपच या आकांक्षा पूर्ण करू शकेल”, अशा शब्दांत नरेद्र मोदी यांनी काॅंग्रेसवर टीका केली आहे. (Assembly Election 2023 Result)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.