Ashish Shelar : अनध‍िकृत शाळांची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करा; आश‍िष शेलार यांची मागणी

99
Ashish Shelar : अनध‍िकृत शाळांची 'एसआयटी'मार्फत चौकशी करा; आश‍िष शेलार यांची मागणी

अनध‍िकृत शाळांची संख्या पाहता याबाबत कोणते रॅकेट आहे की, काय असा प्रश्न पडतो. त्यामुळे या प्रकरणी एसआयटी नियुक्त‍ करुन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा आमदार ॲड आश‍िष शेलार (Ashish Shelar) यांनी शुक्रवारी (२१ जुलै) विधानसभेत केली.

राज्यात श‍िक्षण विभागाने केलेल्या पाहणीमध्ये १ हजार ३०० पैकी ८०० शाळा या कागदपत्रातील तृटींमुळे अनध‍िकृत ठरल्याची बाब निदर्शनास आल्याबाबत तारांकीत प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. याबाबत उत्तर देताना शालेय श‍िक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले की, ६६१ खाजगी शाळा या अनध‍िकृत असल्याचे समोर आले असून, अशा अनध‍िकृत शाळांवर दंडात्मक आण‍ि फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

(हेही वाचा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा करणार; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती)

यावर उपप्रश्न विचारताना आमदार शेलार म्हणाले की, या शाळा अनध‍िकृत कशा ठरल्या, त्याची कारणे कोणती आहेत, यावर उत्तर देताना शालेय श‍िक्षण मंत्र्यांनी सांगितले की, कागद पत्रांची पूर्तता न केल्याने या शाळा अनध‍िकृत ठरल्या आहेत. परंतु, शाळांच्या परवानग्यांमध्ये दिसून येणारी ही दिरंगाई पाहता यामध्ये कोणते रॅकेट काम करतेय का असा प्रश्न पडतो. त्यामुळे या प्रकरणी एसआयटी नियुक्त करुन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेलार यांनी केली. त्यावर उत्तर देताना मंत्र्यांनी उच्चस्थरिय चौकशी करण्याचे मान्य केले.

शाळाबाह्य मुलांसाठी सिग्नल शाळा सुरू करा

– शाळाबाह्य मुलांसाठी ठाण्यात सुरु झालेल्या सिग्नल शाळेसारख्या शाळा सुरू करा, अशी मागणी शेलार यांनी तारांकित प्रश्नावर बोलताना केली.

– याबाबत उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले की, सन 2022 23 मध्ये राज्यात आढळून आलेल्या 9305 शाळाबाह्य बालकांपैकी 9004 बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात सरकारला यश आले आहे.

– दिनांक 30 जून 2022 च्या शासन निर्णयानुसार तीन ते अठरा वयोगटातील शाळाबाह्य व स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी “मिशन झिरो ड्रॉप आउट” या नावाने 5 जुलै ते 20 जुलै 2022 या कालावधीमध्ये मोहीम राबविण्यात आली होती.

– या मोहिमेत सन 2022- 23 मध्ये राज्यात 4,650 मुले व 4,675 मुली असे एकूण 9305 बालके शाळाबाह्य आढळून आली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.