Ashish Shelar : उबाठा तर मुंबईत बैलगाडीतून फ‍िरा असेही सांगेल – आश‍िष शेलार

210
Ashish Shelar : उबाठा तर मुंबईत बैलगाडीतून फ‍िरा असेही सांगेल - आश‍िष शेलार
Ashish Shelar : उबाठा तर मुंबईत बैलगाडीतून फ‍िरा असेही सांगेल - आश‍िष शेलार

उबाठा गटाचा नेहमीच विकास कामांना विरोध राहिला आहे, मुंबईत मेट्रो, कोस्टल रोड, बुलेट ट्रेन या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्याचे काम उबाठाने केले प्रत्येक विकास प्रकल्पाला विरोध करणारी उबाठा एक दिवस मुंबईकारांना बैलगाडीतून फ‍िरा असेही सांगायला कमी करणार नाही, असा टोला भाजपा आमदार ॲड. आश‍िष शेलार यांनी विधानसभेत लगावला. विधानसभेत आज महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन सुधारणा विधेयक २०२३ मंजूरीसाठी मांडण्यात आले होते. तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळामध्ये याच कायद्यात सुधारणा करुन जो बदल करण्यात आला होता, तो आज पुन्हा निष्कसित करण्यात आला.

मुंबई शहरातील विकास कामे करताना जी झाडे तोडावी लागतात किंवा स्थलांतरीत करावी लागतात, त्याची परवानगी देण्याचे अध‍िकार मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राध‍िकरणाला होते. मात्र ठाकरे सरकारच्या काळात या कायद्यात बदल करुन २०० पेक्षा जास्त झाडे तोडण्याचे अध‍िकार महापालिकेकडून काढून घेऊन ते अध‍िकार राज्य शासनाकडे घेण्यात आले होते ते पुन्हा पालिकेला देण्याबाबतचा बदल आज विधानसभेत करण्यात आला.

या विधेयकावर बोलातना आमदार ॲड. आश‍िष शेलार यांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. हे बदल त्यावेळी करण्यात आले त्यातून मुंबई महापालिकेच्या अध‍िकारावर गदा आणण्यात आली होती. केवळ स्वत:ची इमेज पर्यावरण वादी करण्यासाठी तत्कालीन पर्यावरण मंत्र्यांनी हा बदल केला होता. या बदलामुळे मंत्रालयात एक टेबल वाढविण्यात आला होता. २०० पेक्षा जास्त झाडे तोडण्याची परवानगीची फाईल माझ्याकडेच आली पाह‍िजे या कू-हेतूनेच हे बदल करण्यात आले होते.

(हेही वाचा – Food and Drug Administration : अन्न व औषध प्रशासनावर औषध विक्रेत्यांचा गंभीर आरोप)

अशा प्रकारे बदल करताना कोणतेही सबळ कारण देण्यात आले नाही. तशी कुणी मागणी केली अथवा परिस्थीती निर्माण झाली असेही चित्र नव्हेते. पण केवळ आपल्याकडे अध‍िकार असायला हवेत म्हणून हे बदल तत्कालीन पर्यावरण मंत्र्यांनी केले होते. सर्वसाधारण २०० पेक्षा जास्त झाडे तोंडण्याची वेळ ही रस्ता, रेल्वे अथवा विकासाचे मोठे प्रकल्प करताना येते त्यामुळे अशा प्रकल्पांना विरोध करता यावा म्हणून हे बदल तत्कालीन पर्यावण मंत्र्यांनी केले होते.

कारण उबाठाने आजपर्यंत मुंबईतील प्रत्येक विकास प्रकल्पाला विरोधच केलेला दिसून येतो त्यामुळे हा बदला मागचा हेतू चांगला नव्हता असा आरोप करीत आज पुन्हा सरकारने कायद्यात बदल करुन हे अध‍िकार मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राध‍िकरणाला देण्याची भूमिका शिंदे फडणवीस सरकारने घेतल्याबद्दल आमदार ॲड. आश‍िष शेलार यांनी सरकारचे अभ‍िनंदन केले. कारण पालिकांचे वृक्ष प्राध‍िकरण हे कायद्याने स्थापन झालेले असते त्यामध्ये अध‍िकारी, लोकप्रतिनीधी आण‍ि वृक्षांबाबतचे तज्ञही असतात त्यामुळे अशा प्राध‍िकरणाचे अध‍िकार काढून घेण्यात आले होते ते परत देण्याचा निर्णय हा चांगला निर्णय असल्याचे सांगत आमदार आश‍िष शेलार यांनी सरकारचे आभार मानले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.