वीर सावरकरांवर टीका करणाऱ्या राहुल गांधींना अटक करा, रणजित सावरकरांची मागणी

90

भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात एक वक्तव्य केले आणि राज्यातील वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाने राहुल गांधींच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आपमानजनक टीका करणाऱ्या राहुल गांधींना अटक करावी, अशी मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी केली आहे. तर रणजित सावरकर हे राहुल गांधींविरोधात पोलिसात तक्रारही दाखल करणार आहे.

(हेही वाचा – “राहुल गांधी मनोरुग्ण, सावरकर समजण्याइतकी अक्कल या माणसात नाही”)

क्रांतीकारकांशी राहुल गांधी यांचा काही संबंध नाही. पण चंद्रशेखर आझाद, स्वातंत्र्यवीर सावरकर देशद्रोही असल्याचे ट्वीट राहुल गांधींनी केले होते. याविरोधात सावरकरांचे नातू रणजित सावरकरांनी भोईवाडा कोर्टात दाद मागितली होती. कोर्टाने पोलिसांना तपास करण्याचा आदेश दिला होता. पण आता दुसरी तक्रार दाखल करणार असल्याचे रणजित सावरकरांनी सांगितले.

रणजित सावरकर असेही म्हणाले, ज्यावेळी मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांचा अपमान केला होता, तेव्हा बाळासाहेबांनी मुंबईत पाय ठेऊ देणार नाही, असे म्हटले होते. त्यावेळी शिवतीर्थावरच जोडे मारो आंदोलन झाले होते. पण दुर्दैव म्हणजे आज त्याच शिवसेनेचे वारस वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींची गळाभेट घेतात. त्याच्याबरोबर पदयात्रा काढत आहेत.  दरम्यान, कॉंग्रेससोबत जावे लागले तर माझे दुकान मी बंद करेल, असे बाळासाहेब म्हणाले होते. पण आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त काँग्रेसचे नेते सावरकरांचा अपमान करत आहेत. त्यांचे शिवसेना कसं स्वागत करते हे जनतेने पाहावं. आदित्य ठाकरेंनी तर राहुल गांधींची गळाभेट घेतली. अशा व्यक्तीचा सहवासही तुम्ही टाळला पाहिजे. तुम्ही त्यांना ठामपणे आम्ही सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असे सांगितले पाहिजे, असे म्हणत रणजित सावरकरांनी त्यांना सल्ला दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.