Amit Shah : मुलांवरील प्रेमामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षात फूट; अमित शाहांचा घणाघात

Amit Shah : उद्धव ठाकरे यांच्या पुत्रमोहामुळे आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचा पक्ष त्यांच्या मुलीच्या प्रेमामुळे फुटला आहे. त्यांनी विनाकारण भाजपवर आरोप करण्याची गरज नाही, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी हल्लाबोल केला.

140
Amit Shah : मुलांवरील प्रेमामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षात फूट; अमित शाहांचा घणाघात
Amit Shah : मुलांवरील प्रेमामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षात फूट; अमित शाहांचा घणाघात

उद्धव ठाकरे, शरद पवार म्हणतात की, आमचा पक्ष भाजपामुळे तुटला. पण त्यांना सांगू इच्छितो की, त्यांचा पक्ष आम्ही फोडला नाही. उद्धव ठाकरे यांच्या पुत्रमोहामुळे आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचा पक्ष त्यांच्या मुलीच्या प्रेमामुळे फुटला आहे. त्यांनी विनाकारण भाजपवर आरोप करण्याची गरज नाही, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) हल्लाबोल केला. महायुतीचे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील मेंढे (Sunil Mendhe) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

(हेही वाचा – साहेब नाराज आहेत, पण…”; Vasant More राज ठाकरेंना भेटणार?)

संविधानाचा सन्मान, ते अधिक मजबूत करणार

आम्ही बहुमताचा उपयोग हा कलम ३७० हटवण्यासाठी केला. तिहेरी तलाक हटवण्यासाठी आम्ही बहुमताचा उपयोग केला. संविधान बदलण्यासाठी आम्ही उपयोग करणार नाही, जोपर्यंत भाजप आहे, तोपर्यंत आम्ही संविधानाचा सन्मान करत राहणार, अधिक मजबूत करत जाणार. आम्ही कधीही बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला नाही. पण या काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना हरवण्याचे काम केले. त्यांचा सातत्याने अवमान केला.

काँग्रेसने गरिबी हटवाचा केवळ नारा दिला

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गेल्या दहा वर्षांत देशाला सुरक्षित, समृद्ध केलं. देशातील संस्कृतीला मजबूत बनवले. सर्जिकल व एअर स्ट्राईक करून मोदींच्या काळात दहशतवाद्यांना भीती निर्माण करून दिली. हे सर्व सुरक्षित देश करण्यासाठी मोदींनी केले आहे. नक्षलवाद संपवण्याचे काम मोदींच्या काळात झाले असल्याचेही शाह म्हणाले.

शाह म्हणाले, देशात गरीबी हटवण्याचे काम मोदींच्या काळात झाले. काँग्रेसने केवळ गरिबी हटवाचा नारा दिला, पण त्यांनी कधी गरीबी हटवली नाही. गरिबांना गरीब ठेवण्याचे काम केलं. पण मोदींच्या काळात हे चित्र बदलले आहे. गरिबांना धान्य मोफत दिले, तर पुढील पाच वर्षे देखील सातत्याने रेशन मोफत दिले जाणार आहे.

समृद्धी महामार्गामुळे भंडारा जिल्ह्यातील विकास झाला. तर भंडारा गोंदियापर्यंत समृद्धी महामार्ग वाढणार असल्याने येथील विकास अतिशय झपाट्याने होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Amit Shah)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.