Ajit Pawar vs Sharad Pawar : राजीनामा परत घेण्यासाठीचं आंदोलन पवारांच्याच आदेशाने झालं”अजित पवारांचा खळबळजनक आरोप

मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, तुम्ही सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करा आणि भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी व्हा, असं वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं होतं.

125

सध्या निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) व पक्षचिन्ह कुणाचं? यासंदर्भात सुनावणीही चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाच्या दोन दिवसीय राज्यव्यापी शिबिराचा शुक्रवारी (१ डिसेंबर ) समारोप झाला. यादरम्यान अजित पवारांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सामील होण्यापूर्वी शरद पवारांसोबत काय चर्चा झाली होती, याबाबतही अजित पवारांनी भाष्य केलं आहे. “मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, तुम्ही सत्तेत जा, असं शरद पवारांनी आम्हाला सांगितलं होतं, असा दावा अजित पवारांनी केला आहे. (Ajit Pawar vs Sharad Pawar)

काय म्हणाले अजित पवार?
“आम्हाला सातत्यानं गाफील ठेवण्यात आलं. प्रफुल्ल पटेल, मी, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे असे आम्ही १० ते १२ जण देवगिरीवर बैठकीसाठी बसलो होतो. सरकारमध्ये जाण्याबाबत शरद पवारांना थेट सांगितलं तर त्यांना काय वाटेल? असा विचार होता. म्हणून आम्ही सुप्रियाला तिथे बोलवून घेतलं. तिला काहीच सांगितलं नाही की आम्ही सगळे तिथे आहोत. तिला सांगितलं की सगळे जीवाभावाचे सहकारी आहेत. लोकशाहीत बहुमताला आदर द्यावा लागतो, तर संघटना पुढे जाते. सगळं ऐकल्यानंतर तिनं सांगितलं की मला सात ते दहा दिवस द्या. मी साहेबांना राजी करते. आम्ही १० दिवस थांबलो. तेव्हा जयंत पाटील, अनिल देशमुखही तिथे होते”, असा दावा अजित पवारांनी आपल्या भाषणात केला. (Ajit Pawar vs Sharad Pawar)

(हेही वाचा :Pune: ‘एनडीए’च्या दीक्षान्त संचलनात प्रथमच मुलींच्या बटालियनने दिली मानवंदना)

शरद पवारांच्या राजीनाम्यावेळी नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राजकीय आत्मकथेच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भावनिक झाले आणि पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी आंदोलन करू लागले. मात्र पवारांच्या सांगण्यावरूनच ते कार्यकर्ते आंदोलन करत होते, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. “मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, तुम्ही सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना अध्यक्ष करा आणि भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी व्हा, असं वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं होतं. मात्र नंतर त्यांनीच ठाण्याच्या आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाड यांना बोलावून राजीनामा मागे घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आंदोलन करायला सांगितलं,” असा आरोप अजित पवार यांनी काका शरद पवारांवर केला आहे. (Ajit Pawar vs Sharad Pawar)

‘शरद पवारांनी आम्हाला गाफील ठेवलं
‘शरद पवारांवर हल्लाबोल करताना अजित पवार यांनी म्हटलं आहे की,आधी त्यांनी स्वत:च सांगितलं की मी राजीनामा देतो आणि नंतर राजीनामा मागे घेण्यासाठी लोकांना आंदोलने करायला सांगितली. हे नेमकं कशासाठी? भूमिकेबाबत सतत धरसोड करण्यात आली आणि आम्हाला गाफील ठेवण्यात आलं. शपथविधीनंतरही सर्व आमदार आणि मंत्र्यांना भेटायला बोलावलं. सांगण्यात आलं की गाडी ट्रॅकवर आहे. मात्र नंतरही निर्णय घेण्यात आला नाही. मग आमचा वेळ का घालवला?” असा सवालही अजित पवारांनी केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.