अजित पवार यांचा शरद पवार यांना ‘जय श्रीराम’; राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा अध्यक्षांना हटविले

123
अजित पवार यांचा शरद पवार यांना 'जय श्रीराम'; राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा अध्यक्षांना हटविले
अजित पवार यांचा शरद पवार यांना 'जय श्रीराम'; राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा अध्यक्षांना हटविले

वंदना बर्वे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुभाजन झाल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यातील गदायुध्दाने आणखी एक उंची गाठली आहे. शरद पवार यांनी नेमलेल्या दहा राज्यांतील प्रदेशाध्यक्षांना अजित पवार यांनी पदावरून हटविले आहे.

अजित पवार गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा राज्यांतील प्रदेशाध्यक्षांची पदावरून उचलबांगडी केली आहे. ही कारवाई अजित पवार यांच्या सांगण्यावरून केली गेली, हे येथे उल्लेखनीय. सुरवातीला शरद पवार आणि अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला दावा केला होता. आधी शरद पवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेणारे नऊ मंत्र्यांना निलंबित केले. आता अजित पवार यांनी दहा प्रदेशाध्यक्षांची उचलबांगडी केली आहे.

(हेही वाचा – अटक टाळण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली २५ लाखांची लाच)

अजित पवार यांच्या गटाने निष्क्रियता आणि संघटनेचे काम योग्य पद्धतीने न केल्याच्या आरोपावरून तडकाफडकी पदावरून हटवित आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली. यात दिल्ली, बिहार, छत्तीसगड, पंजाब, हरियाणा, गोवा, पश्चिम बंगाल, मणिपूर, राजस्थान आणि अंदमान-निकोबार यांचा समावेश आहे. या राज्यांतील कार्यकारी संस्थाही विसर्जित करण्यात आल्या आहेत. ज्या दहा राज्यांच्या अध्यक्षांना काढून टाकण्यात आले आहे तेथे पर्यवेक्षक पाठवून लवकरच नवीन नियुक्त्या केल्या जाणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.