Rajasthan Election 2023 : २० वर्षे……वसुंधरा राजे, गहलोत यांचेच राजस्थानवर राज्य…..यावेळी कोण होणार मुख्यमंत्री?

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाली आहे.

83
Rajasthan Election 2023 : २० वर्षे......वसुंधरा राजे, गहलोत यांचेच राजस्थानवर राज्य.....यावेळी कोण होणार मुख्यमंत्री?
Rajasthan Election 2023 : २० वर्षे......वसुंधरा राजे, गहलोत यांचेच राजस्थानवर राज्य.....यावेळी कोण होणार मुख्यमंत्री?
  • वंदना बर्वे

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. विरोधक एकमेकांवर तोफ डागण्यात मग्न आहेत. मात्र यात एक बाब प्रकर्षाने जाणवते ती हिच की मागील २० वर्षापासून काँग्रेसचे अशोक गहलोत आणि भारतीय जनता पक्षांच्या वसुंधरा राजे यांचेच राज्य मुख्यमंत्री म्हणून राजस्थानवर कायम आहे. यामुळेच यावेळी राजस्थान चा मुख्यमंत्री कोण असेल याची उत्सुकता सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. (Rajasthan Election 2023)

राजस्थान बाबत विशेष बाब म्हणजे मतदार प्रत्येक वेळी नवीन पक्षाला संधी देतात. या एकमेव कारणामुळे या निवडणूकामध्ये कोणता पक्ष जिंकेल आणि कोणता पक्ष हरेल हे बघणे उत्सुकता वाढविणारे आहे. कारण या वेळची निवडणूक अटीतटीची असल्याचे बोलले जातेय, हे महत्वाचे. (Rajasthan Election 2023)

सर्वच पक्षाचे मातब्बर नेते जीव ओतून प्रचार करीत आहेत. तसेच मतदारांना भुरळ घालण्यासाठी विविध योजना राबवित आहेत. मागील अनेक वर्षांपासून राज्यात सत्ताबदल होतो, पण मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून येतात. या दोघांचा प्रभाव आपापल्या विधानसभा मतदारसंघात आणि जनतेमध्ये कायम आहे. १९९९ पासून सरदारपुरा विधानसभा निवडणुकीत अशोक गेहलोत यांचे वर्चस्व आहे, तर २००३ पासून वसुंधरा राजे या झालरापाटनमध्ये वर्चस्व गाजवत आहेत. (Rajasthan Election 2023)

(हेही वाचा – Narco Test Department Raid : नार्कोटेस्ट विभागाची शिरूरमध्ये धडक कारवाई; तब्बल १७४ किलो ड्रग्ज जप्त)

मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे हे राजस्थानमधील दोन मोठे नेते आहेत. ज्यांच्या धुरीवर गेल्या अडीच दशकांपासून राज्याचे राजकारण चालले आहे. आजपर्यंत काँग्रेस वसुंधरा राजे यांना आणि भाजप अशोक गेहलोत यांना हरवू शकले नाही. या बलाढ्य उमेदवारांच्या तुलनेत इतर कोणताही उमेदवार दिला तरी त्यांचा चेहरा फिका पडतो. (Rajasthan Election 2023)

सरकार कुणाचीही असो राजस्थानमध्ये गेहलोत आणि वसुंधरा राजेंना आव्हान देणारा उमेदवार अद्याप सापडलेला नाही, हा ट्रेंड गेल्या २० वर्षांपासून सुरू आहे. जोधपूरच्या सरदारपुरा जागेवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि झालावाडच्या झालरापाटन जागेवर माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या विरोधात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना अद्याप उमेदवार मिळू शकलेला नाही. अशा स्थितीत विधानसभा निवडणुकीत पक्षांना या वेळी तरी तगडे उमेदवार देता येतील का? अशी चर्चा आहे. (Rajasthan Election 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.