Israel-Palestine Conflict : इस्रायल युद्धात फेसबुक आणि इन्स्टाला 24 तासांचा अल्टिमेटम

मेटाच्या वतीने सांगण्यात आले आहे की, कंपनीने या संदर्भात एक टीम तयार केली असून त्यात हिब्रू आणि अरबी भाषा बोलणाऱ्या लोकांचा समावेश आहे.

104
Israel-Palestine Conflict : इस्रायल युद्धात फेसबुक आणि इन्स्टाला 24 तासांचा अल्टिमेटम
Israel-Palestine Conflict : इस्रायल युद्धात फेसबुक आणि इन्स्टाला 24 तासांचा अल्टिमेटम

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपियन युनियनने (EU) फेसबुक आणि इन्स्टाग्रामला अल्टिमेटम दिला आहे. (Israel-Palestine Conflict) युरोपियन युनियनने फेसबुक आणि इंस्टाग्रामची कंपनी मेटाला 24 तासांची मुदत दिली आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून प्लॅटफॉर्मवरून सर्व हमास समर्थित पोस्ट हटवाव्या लागतील. या प्रकरणी मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांना पत्र लिहून फेसबुक आणि इंस्टाग्रामने हमासशी संबंधित पोस्टबाबत सावध राहावे, असे म्हटले आहे. असे न झाल्यास, ते  युरोपियन युनियनच्या नवीन नियमांचे उल्लंघन मानले जाईल. झुकेरबर्ग यांना येत्या २४ तासांत या नोटीसला उत्तर द्यावे लागणार आहे. या पत्रात मेटाला इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान दहशतवाद आणि द्वेषयुक्त भाषणाचे समर्थन करणाऱ्या पोस्ट हटविण्यास सांगितले आहे. (Israel-Palestine Conflict)

(हेही वाचा – ADTT : AI तंत्रज्ञान ठरवणार तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स द्यायचे की नाही)

मेटाच्या वतीने सांगण्यात आले आहे की, कंपनीने या संदर्भात एक टीम तयार केली असून त्यात हिब्रू आणि अरबी भाषा बोलणाऱ्या लोकांचा समावेश आहे. हे हमास-समर्थित पोस्ट ओळखण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी कार्य करतील. मेटाने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, प्लॅटफॉर्म सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्याकडून काम केले जात आहे. तसेच, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या साहित्यावर कारवाई केली जात आहे. यासाठी त्यांची टीम 24 तास कार्यरत आहे. भारतातही सामाजिक माध्यमांवर हमासच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. (Israel-Palestine Conflict)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.