Parliament Attack: संसदेवर हल्ला करणाऱ्या आरोपींची पॉलिग्राफी टेस्ट होणार, 2 जानेवारीपासून सुनावणी

144
Parliament Attack: संसदेवर हल्ला करणाऱ्या आरोपींची पॉलिग्राफी टेस्ट होणार, 2 जानेवारीपासून सुनावणी
Parliament Attack: संसदेवर हल्ला करणाऱ्या आरोपींची पॉलिग्राफी टेस्ट होणार, 2 जानेवारीपासून सुनावणी

लोकसभेचे कामकाज सुरू असताना अचानक दोन तरुणांनी संसदेत घुसून स्मोकबॉम्ब (Parliament Attack) हल्ला करण्याची घटना १३ डिसेंबरला घडली होती. ज्या आरोपींनी हा स्मोकबॉम्ब हल्ला केला त्या आरोपींची दिल्ली पोलीस पॉलिग्राफी टेस्ट करणार आहेत.

संसदेवर हल्ला करण्यामागे सागर शर्मा, नीलम आझाद, अमोल शिंदे, ललित झा, मुकेश कुमावत आणि मनोरंजन डी या तरुणांचा नेमका काय उद्देश होता, हे जाणून घेण्यासाठी ही टेस्ट गरजेची आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या टेस्टच्या परवानगीसाठी दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणी न्यायालयात २ जानेवारीपासून सुनावणी होणार आहे. दिल्ली पोलिसांनी गुरुवारी (28 डिसेंबर) स्मोकबॉम्ब हल्ल्यातील आरोपींना न्यायालयात हजर केले.

(हेही वाचा – Ind vs SA Test Match : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मानहानीकारक पराभवानंतर जागतिक कसोटी क्रमवारीत भारताची पाचव्या स्थानावर घसरण )

सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी भूमिका मांडली. सर्व आरोपी पॉलिग्राफी टेस्टसाठी तयार आहेत का? हे त्यांना विचारावे, अशी विनंती पोलिसांनी केली. यावर लीगल रिमांड काऊन्सिलशी चर्चा करावी लागेल आणि ते आता न्यायालयात उपस्थित नाहीत, ते दिल्लीत आहेत, असे न्यायालयाने सांगितले.

आरोपींना त्यांच्या कुटुंबातील कुणाशी बोलायचे असेल, तर त्यांनी त्याकरिता न्यायालयाला अर्ज सादर करावा, असेही न्यायालयाने सांगितले. या घटनेमुळे संसदेतील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ करत सरकारने उत्तर देण्याची मागणी लावून धरल्यामुळे तब्बल १४६ खासदारांचे निलंबन करण्यात आले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.