Republic Day 2024 : पालकमंत्रीपदाची आस लावून बसलेल्या भरत गोगावलेंना धक्का?

आदिती तटकरेंच्या हस्ते रायगडमध्ये ध्वजारोहण

300
Republic Day 2024 : पालकमंत्रीपदाची आस लावून बसलेल्या भरत गोगावलेंना धक्का?
Republic Day 2024 : पालकमंत्रीपदाची आस लावून बसलेल्या भरत गोगावलेंना धक्का?

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गट सहभागी झाला. त्यानंतर शिंदे गटातील अनेक इच्छुकांना आपल्या स्वप्नांवर पाणी सोडावे लागले. याच नाराजीतून अजूनही काही जिल्ह्यांना पूर्णवेळ पालकमंत्री (Guardian minister) मिळालेले नाही. दरम्यान, भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) येत्या शुक्रवारी म्हणजेच २६ जानेवारी २०२४ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाचवेळी म्हणजे सकाळी ९.१५ वाजता होणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासनाने येत्या २६ जानेवारीला ध्वजारोहण करणाऱ्या मंत्री, पालक मंत्र्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये रायगडचे ध्वजारोहण हे मंत्री आदिती तटकरेंच्या (Aditi Tatkare) हस्ते होणार आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदाची आस लावून बसलेले शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांना धक्का बसल्याचे दिसून येत आहे. (Republic Day 2024)

(हेही वाचा – Maratha Reservation : आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही; मनोज जरांगे भूमिकेवर आग्रही)

मागील वेळी काय घडले होते?

मागील वेळी हाच ध्वजारोहण जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पार पडला होता. सध्या उदय सामंत यांच्याकडे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. मात्र, ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने तिथे ध्वजारोहण करणार आहे. मागील वेळीही त्यांनी रत्नागिरी येथे ध्वजारोहण केले होते आणि रायगडमध्ये तेथील जिल्हाधिऱ्यांनी केले होते. मात्र, यावेळी रायगडमध्ये मंत्री अदिती तटकरे या ध्वजारोहण करणार असल्याने त्यांनाच पालकमंत्री पद मिळणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. (Republic Day 2024)

राज्यात महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार असताना आदिती तटकरे याच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री असल्याने महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) असलेल्या तत्कालीन शिवसेना आमदारांच्या नाराजी मुळे सत्ता परिवर्तन झाले होते. आता पुन्हा आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद मिळाल्यास भरत भोगावले सह रायगड जिल्ह्यातील शिवसेना आमदार काय भूमिका घेणार याकडे देखील संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. (Republic Day 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.