Australian Open 2024 : ॲलेक्झांडर झ्वेरेवचा कार्लोस अल्काराझला पराभवाचा धक्का 

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये धक्कादायक पराभवांचा सिलसिला सुरूच राहिला आहे. 

139
Australian Open 2024 : ॲलेक्झांडर झ्वेरेवचा कार्लोस अल्काराझला पराभवाचा धक्का 
Australian Open 2024 : ॲलेक्झांडर झ्वेरेवचा कार्लोस अल्काराझला पराभवाचा धक्का 
  • ऋजुता लुकतुके

अलेक्झांडर झ्वेरेव बुधवारी कुणालाही हरवू शकत होता असा त्याचा फॉर्म होता. आणि अशावेळी त्याच्या तावडीत सापडला तो दुसरा मानांकित कार्लोस अल्काराझ. त्याने अल्काराझचा ६-१, ६-३, ६-७ आणि ६-४ असा आरामात पराभव केला. पहिल्या सेटमध्येच त्याचा धडाका असा होता की, त्याने सर्व्हिसवर फक्त २ गुण गमावले. बाकी सगळेच्या सगळे त्याने जिंकले. (Australian Open 2024)

दुसऱ्या सेटमध्येही त्याने अल्काराझची सर्व्हिस दोनदा भेदली. खरंतर इथंच अल्काराझ ढेपाळला होता. आणि त्याच्याकडून चुका होऊ लागल्या होत्या. पण, त्याने तिसरा सेट टायब्रेकरपर्यंत खेचून सामन्यात जान आणण्याचा प्रयत्न केला. पण, पुन्हा निर्णयाक क्षणी चौथ्या सेटमध्ये त्याची सर्व्हिस भेदली गेली. आणि सहावा मानांकित झ्वेरेव विजयी झाला. (Australian Open 2024)

खरंतर झ्वेरेव तिसऱ्या सेटपर्यंत ६-१, ६-३ आणि ५-२ असा आघाडीवर होता. सरळ तीन सेटमध्ये तो जिंकू शकला असता. पण, तिथेच त्याला थोडा थकवा जाणवू लागला. आणि त्याच्या हालचाली मंदावल्या. तुमच्या पेक्षा अव्वल असलेल्या खेळाडूला हरवतानाचं ते दडपण होतं, असं सामना संपल्यानंतर झ्वेरेव म्हणाला. (Australian Open 2024)

(हेही वाचा – National Gallantry and Service Awards : राष्ट्रीय शौर्य आणि सेवा पुरस्कार जाहीर; देशभरातील ११३२ कर्मचारी होणार सन्मानित)

‘मी पुढे होतो. आणि अशा खेळाडूसमोर खेळत होतो, जो गेली दोन वर्ष अव्वल खेळ करत होता. आणि दोन ग्रँडस्लॅम जिंकलेला होता. त्यामुळे विजय जवळ आल्यावर थोडी चलबिचल झाली. पण, चौथ्या सेटमध्ये मी पुन्हा स्वत:ला सावरलं,’ असं झ्वेरेव त्याविषयी बोलताना म्हणाला. (Australian Open 2024)

चौथ्या सेटमध्ये ४-४ अशी बरोबरी होती. पण, अशा निर्णायक वेळी झ्वेरेवने अल्काराझची सर्व्हिस भेदली. आणि पुढचा सर्व्हिस गेम जिंकत सामनाही खिशात टाकला. (Australian Open 2024)

आता सेमी फायनलमध्ये त्याचा मुकाबला रशियाच्या डॅनियल मेदवेदेवशी होणार आहे. तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना अव्वल मानांकित नोवाक जोकोविच (Novak Djokovic) आणि सिनर यांच्यात होणार आहे. (Australian Open 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.