बंगालच्या निवडणुकांना हिंसाचाराचे गालबोट; चौकशीसाठी भाजप खासदारांची समिती स्थापन

127
बंगालच्या निवडणुकांना हिंसाचाराचे गालबोट; चौकशीसाठी भाजप खासदारांची समिती स्थापन
बंगालच्या निवडणुकांना हिंसाचाराचे गालबोट; चौकशीसाठी भाजप खासदारांची समिती स्थापन

पोलीस बळ पुरेसे असूनही योग्य रित्या वापरले न गेल्यामुळे बंगाल मधील निवडणूकीमध्ये मोठया प्रमाणात हिंसाचार झाला. यामुळे सरकारच्या कार्यशैली वर अनेक प्रश्न चिन्ह निर्माण होतात. हिंसाचाराच्या चौकशीसाठी भाजपने भाजप खासदारांची समिती स्थापन केली. माजी कायदा मंत्री रविशंकर प्रसाद अध्यक्षस्थानी असतील. ही समिती राज्याचा दौरा करून तपास अहवाल जेपी नड्डा यांना सादर करणार आहे. हिंसाचाराच्या घटनांबाबत बीएसएफचे डीआयजी एसएस गुलेरिया यांनी सांगितले की, त्यांनी निवडणूक आयोगाकडे अनेक वेळा संवेदनशील बूथची माहिती मागितली होती, मात्र त्यांना ही माहिती देण्यात आली नाही. राज्य निवडणूक आयोगाने ७ जून रोजीच संवेदनशील बूथची संख्या दिली. त्याचे ठिकाण किंवा अन्य कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

ते म्हणाले की, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) चे ५९,००० सैन्य आणि २५ राज्यांचे सशस्त्र पोलीस देखील राज्यात उपस्थित होते, परंतु त्याचा योग्य वापर होऊ शकला नाही. राज्य सरकारने अहवाल दिला होता की केवळ ४,८३४ संवेदनशील बूथ आहेत ज्यावर CAPF तैनात होते, परंतु प्रत्यक्षात त्याहून अधिक संवेदनशील पोलिस बूथ आहेत. स्थानिक प्रशासनाच्या मागणीवरूनच बीएसएफची तैनाती करण्यात आली होती. निवडणुकीदरम्यान हिंसाचार पसरवल्याच्या आरोपांबाबत बंगालचे निवडणूक आयुक्त राजीव सिन्हा म्हणाले की, निवडणुकीदरम्यान गर्दीवर नियंत्रण ठेवणे ही जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे. बंगालमध्ये केंद्रीय दल वेळेत कंपन्या तैनात करू शकले नाहीत, असा आरोप त्यांनी केला. विरोधी पक्षनेते आणि नंदीग्रामचे भाजप आमदार सुवेंदू अधिकारी यांनी पंचायत निवडणुकीत झालेल्या हत्याकांडासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जबाबदार धरले. ते म्हणाले, टीएमसीचे गुंड आणि पोलिसांच्या संगनमताने अनेक हत्या झाल्या. सीबीआय आणि एनआयएने या प्रकरणाची चौकशी करावी.

(हेही वाचा – बिनखात्याचे मंत्री म्हणून मंत्रिमंडळ बैठकीला बसणार नाही; राष्ट्रवादीच्या नकारामुळे कॅबिनेट पुढे ढककली)

अधिकारी म्हणाले-ही निवडणूक होत नव्हती, मतांची लूट होत होती, मृत्यू होत होते. हिंसाचार आणि जाळपोळ झाली. निवडणुकीत केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्याची चर्चा होती. हिंसाचाराच्या वेळी ते कुठे होते? राज्य सरकारवर आरोप करताना सुवेंदू अधिकारी म्हणाले की, सीसीटीव्ही मॉनिटरिंगचा दावा केला होता, मात्र कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत. राज्यात ८ जून रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला, तेव्हापासून राज्यात हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. ८ जून ते ७ जुलैपर्यंत या हिंसाचारात १९ जणांना जीव गमवावा लागला होता. तर ८ जुलै रोजी वेगवेगळ्या घटनांमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला.

आज ३२ दिवसांनंतर राज्यातील हिंसाचारात मृतांचा आकडा ३६ वर पोहोचला आहे. १० जुलै रोजी मतदानादरम्यान मुर्शिदाबादमध्ये ३५ जिवंत बॉम्ब सापडले होते, जे बॉम्बशोधक पथकाने वेळीच निकामी केले होते. जलपाईगुडीतील जुम्मागच येथील मतदान केंद्रावर एक महिला दुसऱ्या महिलेला मतदान करण्यासाठी मदत करताना दिसली. बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी सोमवारी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराची माहिती त्यांनी शहा यांना दिली. मतदानाच्या दिवशी त्यांनी राज्याचा दौरा केला. शुभेंदू अधिकारी म्हणाले की, ६०० बूथची यादी निवडणूक आयोगाला दिल्यानंतर भाजपने तेथे फेरमतदानाची मागणी केली होती. तर १८००० बूथवर चुकीचे मतदान झाले होते. आम्ही पुरावे गोळा करत आहोत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.