Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाकडून प्रदान करण्यात येणाऱ्या ‘शिखर सावरकर पुरस्कार २०२३’साठी आवेदन करण्याचे आवाहन

149

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘शिखर सावरकर पुरस्कार २०२३’ चा पुरस्कार प्रदान सोहळा बुधवार २३ आ‌ॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. या पुरस्कारापैकी जीवनगौरव पुरस्कार वगळता अन्य दोन पुरस्कारांसाठी इच्छूक व्यक्ती आणि संघटना यांनी ५ ऑगस्टपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कार्यालयात आवेदन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गतवर्षीप्रमाणेच यंदाही गिर्यारोहणात राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषतः हिमालयीन विभागात अतुलनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ भारतीय दिग्गजांकरीता जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सह्याद्री विभागात विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या उत्कृष्ट साहसी गिर्यारोहकाकरीता एक वैयक्तिक आणि सह्याद्री विभागातच उत्कृष्ट साहसाबरोबरच इतर पूरक कामासाठी एक सांघिक अर्थात् संस्थात्मक स्तरावर दिला जाणारा पुरस्कार असे एकूण तीन पुरस्कार दिले जाणार आहेत. मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि आकर्षक धनराशी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

(हेही वाचा Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मार्साय)

पुरस्कारांच्या संपूर्ण प्रक्रियेत निवड समितीसह स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल. २०१५ हे वर्ष स्वातंत्र्यवीरांच्या पवित्र आत्मार्पणाचे ५०वे वर्ष होते. साहसाशी असलेला त्यांचा अनन्यसाधारण असा घनिष्ठ संबंध लक्षात घेऊनच सावरकर स्मारकाने तेव्हा एका राष्ट्राभिमानी हिमालयीन मोहिमेचे आयोजन केले होते. अशा भव्य आणि महत्वाकांक्षी मोहिमेकरीता ७ निष्णात गिर्यारोहकांची देशभरातून निवड करण्यात आली होती. तेव्हा अनेक अडचणींवर मात करत स्मारकाच्या या पथकाने २३ आ‌ॅगस्ट २०१५ या दिवशी हिमाचल प्रदेशात कर्चानाला परिसरातील एक अजिंक्य, अनामिक हिमशिखर सर केले होते आणि त्याद्वारे स्वातंत्र्यवीरांना ५०व्या आत्मार्पण वर्षानिमित्त एक अविस्मरणीय साहसी मानवंदना दिली. याच ऐतिहासिक मोहिमेत यशस्वीरीत्या सर झालेले त्यावेळचे अनाघ्रात, अनामिक हिमशिखर हे “शिखर सावरकर” म्हणून ओळखले जाते. या पार्श्वभूमीवर या शिखर सावरकर पुरस्काराचे आयोजन केले जात आहे. या पुरस्कारांसाठी साहसप्रिय व्यक्ती आणि मान्यवर संस्था यांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की, खालील वेबलिंकच्या आधारे संगणकीय आवेदनपत्रे ऑनलाईन भरुन ती त्याच पद्धतीने विनाविलंब आणि विहित मुदतीतच सादर करावयाची आहेत.

वेबलिंक खालीलप्रमाणे आहे…

शिखर सावरकर युथ टीम अॅडव्हेंचर
https://forms.gle/PSaJeNddaeBkPeJX6

शिखर सावरकर युथ अॅडव्हेंचर
https://forms.gle/g5iMrPA2S9knBbA97

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.