राष्ट्रवादीत अजित ‘दादा’; कुणाला किती आमदारांचा पाठिंबा? पहा यादी

222
राष्ट्रवादीत अजित 'दादा'; कुणाला किती आमदारांचा पाठिंबा? पहा यादी
राष्ट्रवादीत अजित 'दादा'; कुणाला किती आमदारांचा पाठिंबा? पहा यादी
अजित पवारांसह समर्थक आमदारांनी शिवसेना-भाजपा युतीला पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचीही दोन शकले झाली आहेत.  सर्वाधिक आमदार आपल्या पाठिशी असल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात कोणाच्या मागे किती संख्याबळ आहे, याची यादी ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या हाती लागली आहे. त्यानुसार अजित पवार यांच्या पाठीशी ३१ आमदार असून, शरद पवारांना १८ आमदारांनी पाठिंबा दर्शवला आहे.
बुधवारी सकाळी ११ वाजता वांद्रे येथे अजित पवार गटाची, तर दुपारी १ वाजता यंशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार गटाची बैठक बोलावण्यात आली. त्यासाठी आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले. दोन्ही गटांकडून आमदारांना उपस्थितीबाबत व्हीप बजावण्यात आले होते. अजित पवार गटाकडून मंत्री अनिल पाटील, तर शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप जारी केला आहे. मात्र, नेमका व्हीप कोणाचा पाळायचा, याबाबत आमदारांमध्ये संभ्रम दिसून आला.
दरम्यान, अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला ३१ आमदार प्रत्यक्ष हजर असल्याचे दिसून आले. तर, यंशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला १८ आमदार उपस्थित होते. राष्ट्रवादीचे ५ आमदार अनुपस्थित होते.

शरद पवार गटातील आमदार

१) जयंत पाटील – इस्लामपूर
२) जितेंद्र आव्हाड – मुंब्रा कळवा
३) किरण लहामटे – अकोले
४) अशोक पवार – शिरूर
५) रोहित पवार – कर्जत जामखेड
६) अनिल देशमुख – काटोल
७) राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा
८) प्राजक्त तनपुरे – राहुरी
९) सुमन पाटील – तासगाव कवठेमहाकाळ
१०) राजेश टोपे – घनसावंगी
११) चंद्रकांत नवघरे – वसमत (हिंगोली)
१२) सुनिल भुसारा – विक्रमगड
१३) मानसिंग नाईक – शिराळा
१४) मकरंद जाधव – वाई
१५) बाळासाहेब पाटील – कराड उत्तर
१६) अतुल बेनके – जुन्नर
१७) संदीप क्षीरसागर – बीड
१८) चेतन तुपे – हडपसर

अजित पवार गट

१) अजित पवार – बारामती
२) छगन भुजबळ – येवला
३) धनंजय मुंडे – परळी
४) दिलीप वळसे पाटील – आंबेगाव
५) दिलीप मोहिते – खेड आळंदी
६) अनिल पाटील – अमळनेर
७) नरहरी झिरवळ – दिंडोरी
८) धर्मरावबाबा आत्राम – अहेरी
९) माणिकराव कोकाटे – सिन्नर
१०) नीलेश लंके – पारनेर
११) अदिती तटकरे – श्रीवर्धन
१२) संजय बनसोडे – उदगीर
१३) दत्ता भरणे – इंदापूर
१४) प्रकाश सोळंके – माजलगाव
१५) सुनील शेळके – मावळ
१६) यशवंत माने – मोहोळ
१७) बबन शिंदे – माढा
१८) दीपक चव्हाण – फलटण
१९) दीपक बनकर – निफाड
२०) हसन मुश्रीफ – कागल
२१) इंद्रनील नाईक – पुसद
२२) बाळासाहेब आजबे – आष्टी
२३) संग्राम जगताप – अहमदनगर शहर
२४) सुनील टिंगरे – वडगाव शेरी
२५) अण्णा बनसोडे – पिंपरी
२६) हसन मुश्रीफ – कागल
२७) राजेंद्र कारेमोरे – तुमसर
२८) राजेश नरसिंग पाटील – चंदगड
२९) शेखर निकम – चिपळूण
३०) नितीन पवार – कळवण
३१) मनोहर चंद्रिकापुरे – अर्जुनी मोरगाव

अनुपस्थित आमदार

१) अणूशक्तिनगर – नवाब मलिक
२) सरोज अहिरे – देवळाली
३) दौलत दरोडा – शहापूर
४) आशुतोष काळे – कोपरगाव
५) बाबासाहेब पाटील – अहमदपूर
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.