Raj Thackeray ची वरळीकरांना गॅरंटी, आमचा आमदार आला तर अपॉईंटमेंटशिवाय भेटता येईल

130
Raj Thackeray ची वरळीकरांना गॅरंटी, आमचा आमदार आला तर अपॉईंटमेंटशिवाय भेटता येईल
Raj Thackeray ची वरळीकरांना गॅरंटी, आमचा आमदार आला तर अपॉईंटमेंटशिवाय भेटता येईल
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

वरळी विधानसभेत आता मनसेने चांगलेच लक्ष वेधल असून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उमेदवार संदीप देशपांडे यांच्या प्रचारासाठी तब्बल दोन जाहीर सभा घेतल्या आहे. गुरूवारी रात्री झालेल्या जाहीर सभेमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपण ज्यांना मतदान करून निवडून दिला होता आणि ज्यांच्या विरोधात म्हणून मतदान केले होते, त्याच विरोधकांसोबत हे आमदार मांडीला मांडी लावून बसले आणि मंत्री झाले. आपल्याला गृहीत धरले जात आहे. त्यामुळे आपला हा अपमान असून या अपमानाचा बदला या निवडणुकीत त्यांच्या विरोधात मतदान करून घ्या आणि असे झाले नाही तर हा महाराष्ट्र बरबाद होईल अशी भीतीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वरळीतील जाहीर सभेत व्यक्त केली.

वरळी विधानसभेचे मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्या प्रचारासाठी कोळीवाडा पाठोपाठ वरळी जांबोरी मैदान येथे गुरुवारी रात्री पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रभार सभा पार पडली. या प्रचारसभेत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वरळीकरांना शंभर टक्के गॅरंटी दिली. ही गॅरंटी म्हणजे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यंना भेटण्यासाठी कोणत्याही पूर्व परवानगीची अर्थात अपॉईंटमेंची गरज भासणार नाही, याची हमी देतो असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितले. वरळीकरांनी, आपला झालेला अपमान न विसरता संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनाच नव्हेतर मुंबईसह राज्यातील आपल्या सर्व परिचितांना कळवून मनसेच्या उमेदवारांना मतदार करण्याचे आवाहन केले आहे.

(हेही वाचा – प्रियांका वाड्रा, राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचणेही कठीण; Wayanad ची जनता नाराज)

धारावीच्या विरोधामागे आर्थिक राजकारण

कोकणात येणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध केला. परंतु हा विरोध का तर आपला मित्र तोट्यात जाईल म्हणून. कोकणातील नाणार प्रकल्पाच्या विरोधामागे आर्थिक राजकारण आहे. बीडीडी चाळीचा विकास आहे. धारावीचा विकास होत आहे. या धारावीच्या विरोधामागेही आर्थिक राजकारण असल्याचाही आरोप राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला.

माझी ओळख जनतेच्या जीवावर

माझ्यासमोर दोन युवराज आहेत. आदित्यच्या नावासमोर उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि दुसरे उमेदवार मिलिंदच्या नावापुढे मिलिंद देवरा यांची नावे. त्यांची ओळख त्यांच्या वडिलांमुळे आहे. परंतु माझ्या वडिलांचे नाव सुधाकर त्र्यंबक देशपांडे आहे. त्यांना कोणी ओळखत नाही. ते वडिलांच्या जीववार आहेत, तर हा संदीप देशपांडे आपल्या म्हणजे तुमच्या जीवावर आहे. मला माझ्या नावावर उमेदवारी मिळाली आहे. वडिलांच्या नावावर मिळाली नाही. मी जनतेसाठी आंदोलन केली, अंगावर केसेस घेतल्या, त्यासाठी जेलमध्ये गेलो. आज १४ केसेस माझ्या अंगावर आहेत. त्याच्या जोरावर मला ही उमेदवारी मिळाली असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.