Konkan : कोकणात देशातील सर्वात मोठा प्रकल्प येणार; लाखाच्या घरात वाढणार रोजगार
महाराष्ट्रात ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मुंबई बंदर प्राधिकरण यांनी संयुक्तपणे नॅशनल शिपबिल्डिंग अॅन्ड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड (एनशिपएमएल) ही विशेष उद्देश कंपनी स्थापन केली आहे.
कोकणातील (Konkan) दिघी येथे देशातील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकार आणि ‘माझगाव डॉक’ यांच्यात 27 हजार कोटींचा ऐतिहासिक करार झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा करार झाला आहे. जहाजबांधणी प्रकल्पाच्या करारामुळे देशाच्या जहाजबांधणी क्षमतेत महाराष्ट्राचा वाटा 40 टक्क्यांवर पोहोचणार आहे. युद्धनौका आणि व्यापारी जहाजांची निर्मिती करणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्यात सुमारे 90 हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
महाराष्ट्रात ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मुंबई बंदर प्राधिकरण यांनी संयुक्तपणे नॅशनल शिपबिल्डिंग अॅन्ड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड (एनशिपएमएल) ही विशेष उद्देश कंपनी स्थापन केली आहे. केंद्र सरकारच्या ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकास आराखड्यांतर्गत हा प्रकल्प पुढे नेण्यात येत असून, तो ‘मेरीटाइम अमृत काल व्हिजन 2047 ‘च्या उद्दिष्टांना पूरक ठरणार आहे. (Konkan)
या सामंजस्य करारानुसार ‘एमडीएल’ने दिघी येथे प्रतिवर्ष किमान 2 दशलक्ष सकल टनभार (ग्रॉस टनेज) जहाजबांधणी क्षमतेचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती करणे शक्य होणार असून, देशाच्या सागरी औद्योगिक क्षमतेला बळकटी मिळणार आहे. सर्व आवश्यक त्या परवानग्या मिळाल्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू होईल. तसेच, प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे तीन वर्षांचा कालावधी लागण्याती शक्यता आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. (Konkan)
भारतातील ही सर्वात मोठी प्रस्तावित जहाजबांधणी गोदी केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे विकसित करणार आहेत. येथे युद्धनौका आणि व्यावसायिक जहाजे या दोन्हीची निर्मिती केली जाईल; याशिवाय जहाजबांधणी, जहाज तोडणे, पुनर्वापर आणि दुरुस्तीची कामेही केली जातील, असे फडणवीस यांनी सांगितले. या प्रकल्पाद्वारे सुमारे 15000 लोकांना प्रत्यक्ष आणि 75,000 लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची शक्यता आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून देशातील सर्वात मोठी जहाजबांधणी गोदी तयार करतील. जिथे युद्धनौका आणि व्यावसायिक जहाजे दोन्ही बनवली जातील, असं मुख्यनंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. (Konkan) कोकण आणि महाराष्ट्रासाठी हा खूप मोठा करार आहे, असं सांगत फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल बंदर विकास मंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकारी नितेश राणे यांनी म्हटले आहे.
प्रकल्प नेमका कसा असेल?
प्रकल्प : ग्रीनफिल्ड शिपबिल्डिंग इंडस्ट्रियल क्लस्टर