Nitesh Rane यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; सामनामध्ये भाजपाची जाहिरात कशी चालते?

183
राज्यात विधानसभेचं (Assembly election 2024) माहौल चांगलच तापलं आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतदानाचा निकल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी राज्यात प्रचारसभांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, भाजपाचे विद्यमान आमदार नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, “भाजपा आणि शिंदे यांच्या जाहिराती सामनामध्ये का चालतात? भाजपा आणि नेत्यांच्या जाहिरातीवर आक्षेप असेल तर छापू नका. महायुतीचा पैसा चालतो, केवळ सकाळी उठून खडी फोडायची, अशा डबलढोलकी पणाला जनता चांगली ओळखते” अशा शब्दात नितेश राणे यांनी शिवसेना उबाठा (Shivsena UBT Group) गटाचा समाचार घेतला. (Nitesh Rane)

नितेश राणे पुढे म्हणाले की, जर “गौतम अदानी (Gautam Adani) जर एवढे खटकत असतील, तर त्यांचं विमान कस चालतं? लपून छपून कोण भेटतं? ह्याची माहिती आम्ही द्यायची का?” असा इशारा नितेश राणे यांनी दिला. “गौतम अदानींसोबत बसून ढोकळा आणि चटणी खायची आणि इतर वेळी त्यांच्यावर टीका करायची हा नौटंकीपणा जनतेने ओळखलेला आहे” असं नितेश राणे म्हणाले.
(हेही वाचा – काँग्रेस आमदारांना ५० कोटी देऊन खरेदीचा भाजपचा प्रयत्न; CM Siddaramaiah यांचा आरोप)

उद्धव ठाकरेंच्या सभेत हिंदू किती होते आणि गोल टोपीवाले किती होते?’

“कालच्या प्रचार सभेत एक तरी विकासाचा मुद्धा आला का?. एक तरी विकासाचा मुद्धा कालच्या भाषणात दाखवा, मी त्यांना बक्षीस देतो. दरोडेखोर कोण आहेत ते चांदीवाल आयोगाच्या प्रमुखांनी सांगितलं आहे. 23 तारखेनंतर तुम्ही बेरोजगार होणार. पुतळा तयार झाला की फोटोग्राफीची ऑर्डर तुम्हाला देणार” अशी टीका नितेश राणे यांनी केली. “बागायतदारांसाठी असंख्या योजना आहेत ते उद्धव ठाकरेंना दिसत नाही. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) सभेत हिंदू किती होते आणि गोल टोपीवाले किती होते?. उद्धव ठाकरे तेव्हा कॅमेरा साफ करत होते, त्यामुळे बाळासाहेब आणि भाजपा ह्यांचे संबंध समजणार नाहीत” अशी टीका नितेश राणे यांनी केली.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.