प्रियांका वाड्रा, राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचणेही कठीण; Wayanad ची जनता नाराज

93
प्रियांका वाड्रा, राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचणेही कठीण; Wayanad च्या जनतेची भावना
प्रियांका वाड्रा, राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचणेही कठीण; Wayanad च्या जनतेची भावना

राहुल गांधी (Rahul Gandhi) गेल्या ५ वर्षांत आम्हाला भेटलेही नाहीत. प्रियांका वाड्राही (Priyanka Vadra) त्यांच्यासारख्याच मोठ्या नेत्या आहेत. राहुल आणि प्रियांका यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचणेही आम्हाला कठीण होते. त्यांच्या कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे आम्ही त्यांच्याशी कधीच बोलू शकलो नाही. आम्ही बोललो, तरी भाषेच्या अडचणीमुळे त्यांना आमचा मुद्दा कोणीतरी समजावून सांगावा लागतो. त्यामुळे आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत, अशी भावना वायनाड (केरळ) येथील जनतेने व्यक्त केली आहे.

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीचा पत्नी आणि मुलांसह ऑस्ट्रेलियात डे – आऊट)

वायनाड या काँग्रेसच्या (Congress) बालेकिल्लात रिकाम्या झालेल्या राहुल गांधी यांच्या जागी आता त्यांची बहीण प्रियांका वाड्रा उभ्या आहेत. पोटनिवडणुकीसाठी 13 नोव्हेंबर रोजी मतदान झाले आहे. त्या वेळी मतदारांनी राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली.

या वेळी एका वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीने मतदारांशी संवाद साधला असता ते म्हणाले, “राहुल (Rahul Gandhi) यांनी 5 वर्षे काहीच केले नाही. कट्टीकुलम, वायनाड येथील कट्टुनायकन आदिवासी समाजाचे राकेश म्हणाले की, सत्तेत कोणीही आले किंवा गेले, तरी आमच्या जीवनात कोणताही बदल होत नाही. कोणताही नेता वन हक्क कायदा (अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वनवासी), वनहक्क कायदा-2006 ची मान्यता याबाबत बोलत नाही. याची अंमलबजावणी झाली, तर आम्ही आमच्या जमिनी आणि संसाधनांवर हक्क सांगू शकू. राहुल गांधी यांनी 5 वर्षांच्या खासदारकीच्या काळात काहीही केले नाही. त्यांनी कोणतेही मोठे बदल केले नाहीत. निवडणुकीच्या काळात आदिवासींना वेठीस धरण्याचे प्रयत्न नेहमीच होत आले आहेत. आपण फक्त भारतीय नागरिक म्हणून मतदान करत आहोत. याव्यतिरिक्त काहीही वेगळे नाही.

काँग्रेस सरचिटणीस असलेल्या प्रियांका गांधी 2024च्या वायनाड (Wayanad) पोटनिवडणुकीत युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) कडून निवडणूक लढवत आहेत. सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (LDF) ने सत्यन मोकेरी यांना उमेदवारी दिली आहे. सत्यन मोकेरी हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) तीन वेळा आमदार आहेत. ते अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिवही आहेत. भाजपने प्रियांका यांच्या विरोधात भाजपने नव्या हरिदास यांना उमेदवारी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.