स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या वतीने मोडी लिपी हस्ताक्षर, लिप्यंतर स्पर्धेचे आयोजन

जागतिक मोडी लिपी प्रसार समिती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने मोडी लिपी हस्ताक्षर आणि लिप्यंतर स्पर्धेचे आयोजन

61

जागतिक मोडी लिपी प्रसार समिती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पाच शहरांमध्ये सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा आणि शीघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा अशा दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा येत्या १ मे अर्थात महाराष्ट्र दिनी घेण्यात येणार असून राज्यस्तरावरील ही सहावी मोडी लिपी स्पर्धा असणार आहे.

कधी होणार स्पर्धा?

या स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी २९ एप्रिल २०२२ पर्यंत आगावू नोंदणी करणे गरजेचे आहे. मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी या दोन्ही स्पर्धा एकाच दिवशी म्हणजे १ मे २०२२ या दिवशी घेण्यात येतील, या दोन्ही स्पर्धांमधील पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके दिली जातील. तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रही देण्यात येईल. मोडी लिपीचे पुनरुज्जीवन, प्रसार आणि प्रचार व्हावा हा स्मारकाचा उद्देश आहे.

(हेही वाचा – स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हनुमान सेवा मंडळाच्या ठाण्यातील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद)

कुठे होणार स्पर्धेचं आयोजन?

मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, दादर, मुंबई ४०००२८ येथे स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी दूरध्वनी ०२२-२४४६५८७७ येथे संपर्क साधावा.

  • पुणे येथे मोबाईल क्रमांक ९८८११०४३७९
  • अहमदनगर- ऐतिहासिक संग्रहालय – मोबाईल क्रमांक ९३७२१५५४५५
  • कोल्हापूर मोबाईल क्रमांक ९३७१४६०६६१
  • नाशिक येथे मोबाईल क्रमांक ९८५०७४६१७२

या स्पर्धेच्यावेळी पुस्तकविक्रेत्यांनीही मोडी विषयक पुस्तकांचे स्टॉल ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले असून त्यासाठी वर दिलेल्या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.