जेएनयूत रामनवमीच्या दिवशी मांसाहाराला विरोध, अभाविप विद्यार्थ्यांवर डाव्यांचा हल्ला

118

जेएनयूच्या विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा रक्तरंजित संघर्ष निर्माण झाला आहे. रामनवमीच्या दिवशी जेएनयूच्या कावेरी वसतिगृहातील कँटीनमध्ये मांसाहार शिजवण्यास विरोध केला, म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) विद्यार्थ्यांवर डाव्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी हल्ला केला.

रामनवमीच्या दिवशी मांसाहार शिजवायला विरोध

या मारामारीत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कॅम्पसमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी जेएनयूच्या कँटीनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थ मिळत असतात. रामनवमी रविवार, १० एप्रिल रोजी होती. अभाविपच्या विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, रामनवमीच्या दिवशी वसतिगृहाच्या कँटीनमध्ये फक्त शाकाहारी जेवण बनवायला हवे. या दिवशी बरेच विद्यार्थी उपवास करतात. त्यामुळे या दिवशी कँटीनमध्ये मांसाहार शिजवू नये, अशी मागणी केली. मात्र याला डाव्या संघटनांनी विरोध केला. त्यामुळे रामनवमीच्या दिवशी हा संघर्ष झाला.

(हेही वाचा …अन्यथा राजभवनाची इभ्रतही जाईल,संजय राऊतांचा राज्यपालांना इशारा)

कावेरी वसतिगृहाभोवती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

रामनवमीच्या मुहूर्तावर जेएनयूच्या कावेरी वसतिगृहात पूजा आणि मांसाहाराच्या जुन्या पद्धतीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. या मुद्द्यावरून सुरू असलेल्या चर्चेला उधाण आले आणि दोन विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. कॅम्पस प्रशासनाच्या परवानगीनंतर पोलिसांनी जेएनयू कॅम्पसमध्ये प्रवेश केला. हिंसाचारग्रस्त कावेरी वसतिगृहाभोवती पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.