आधार कार्ड अपडेट करण्यासाठी UIDAI ने जारी केल्या नव्या अटी!

95

आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचे महत्वाचे ओळखपत्र आहे. शाळेत प्रवेश घेताना, पासपोर्ट काढताना, बॅंकेतील महत्वाच्या कामांसाठी आधार कार्ड उपयोगी असते. आधार कार्डमधील एखादी लहानशी चूक सुद्धा तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे तुम्ही तुमचे आधार कार्ड वेळोवळी अपडेट करणे महत्वाचे असते. आधार कार्ड धारकांपुढे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, UIDAI ने जन्म तारीख, नावातील बदल यासाठी काही नव्या अटी जारी केल्या आहेत. मात्र, मोबाइल क्रमांक आणि इतर माहिती अपडेट करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही.

( हेही वाचा : एसटीच्या ताफ्यात दाखल होणार ४ हजार नव्या बस)

UIDAI ने जारी केल्या नव्या अटी

जन्मतारीख

जन्म तारखेच्या बदलासाठी जन्माचा दाखला, पॅन कार्ड, पासपोर्ट, इयत्ता दहावी किंवा बारावीचे प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा आवश्यक आहे.

नावातील बदल

आधार कार्डवर नावात बदल करायचा असल्यास यासाठी मार्गदर्शक तत्वं जारी करण्यात आली आहे. UIDAIच्या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार नावात बदल करण्यासाठी केवळ दोनदाच संधी दिली जाणार आहे. यानंतर तुमचे नाव चुकल्यास संबंधित आधार कार्ड अपात्र ठरवण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्हाला नव्या कार्डासाठी अर्ज करणे आवश्यक असेल.

नावात बदल करण्यासाठी कागदपत्र

आधार कार्डवरील नावात बदल करण्यासाठी तुम्हाला पॅनकार्ड, मतदान कार्ड, वाहन चालक परवाना, शासकीय ओळखपत्र, शिक्षणाचं प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र यांसारख्या महत्वाच्या ओळखपत्रांची आवश्यकता भासणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.