Google play व्यवस्थित चालत नसेल तर ‘या’ सोप्या गोष्टी करुन तुम्ही ऍप्स डाऊनलोड करु शकता

166
Indian Apps: गुगलने प्ले स्टोअरवरून 'हे' १० भारतीय अॅप्स हटवले, केंद्र सरकार घेणार कठोर भूमिका
Indian Apps: गुगलने प्ले स्टोअरवरून 'हे' १० भारतीय अॅप्स हटवले, केंद्र सरकार घेणार कठोर भूमिका

तुमच्या अँड्रॉईड फोनमध्ये प्ले स्टोअर वापरून तुम्ही सगळे ऍप्स डाउनलोड करता. पण कधी कधी तुम्हाला असं जाणवतं का, की तुमचं प्ले स्टोअर व्यवस्थित काम करत नाही. असं बऱ्याचदा होत असेल. अशा वेळेस तुमचे प्ले स्टोअर व्यवस्थित चालण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष द्यावे लागेल. त्या गोष्टी कोणत्या ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात..

सर्वात आधी तुमचं इंटरनेट कनेक्शन तपासा. तुम्ही मोबाईलचं इंटरनेट वापरत असाल तर ते व्यवस्थित सुरू आहे का ते पहा किंवा जर तुमच्याकडे घरात वाय-फाय कनेक्शन असेल तर तुमचा मोबाईल त्या इंटरनेटला कनेक्ट आहे का, ते तपासा तसेच तुमच्या वाय-फायची सर्व सेटिंग्ज व्यवस्थित आहे की नाही ते सुद्धा तपासा. जर काही समस्या असेल तर ती सोडवून तुमचा मोबाईल राऊटरला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा.

(हेही वाचा Sandeep Deshpande : उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची मनसे नेते संदीप देशपांडेंनी उडवली खिल्ली)

कधी कधी प्ले स्टोअर वरून तुम्हाला ऍप्स आणि गेम्स डाउनलोड करताना समस्या येऊ शकतात. अशावेळी तुम्ही तुमचे प्ले स्टोअर ऍप अपडेट पेंडिंग असेल तर ते अपडेट करून घ्या. ऍप अपडेट करण्यासाठी सर्वात आधी तुम्ही तुमचा प्ले स्टोअर ऍप उघडा. वरच्या डाव्या बाजूला मेनू आयकॉनवर क्लिक करून सेटिंग्ज उघडा. जर तुमचे ऍप अपडेट पेंडिंग असेल तर तुमच्या स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचे पालन करून ऍप अपडेट करून घ्या.

तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर स्टोअरेज संबंधित मेसेज येत असेल तर तुमच्या मोबाईल मधल्या तुम्हाला नको असलेल्या अतिरिक्त गोष्टी काढून टाका. असे केल्याने तुमच्या मोबाईलमध्ये बरीचशी जागा रिकामी होईल. एवढे केल्यानंतरही तुम्हाला ऍप्स डाउनलोड करण्यासाठी समस्या येत असेल तर एकदा तुमचा मोबाईल बंद करून पुन्हा सुरू करा. एवढे केल्याने नक्कीच तुमच्या मोबाईलवर तुम्हाला प्ले स्टोअर किंवा इतर कोणतेही ऍप्स डाउनलोड करण्यासाठी समस्या येणार नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.