एलॉन मस्क यांनी मागितली ३५० दशलक्ष युजर्सची माफी

193
एलॉन मस्क यांनी मागितली ३५० दशलक्ष युजर्सची माफी
एलॉन मस्क यांनी मागितली ३५० दशलक्ष युजर्सची माफी

मागच्या वर्षी एलॉन मस्क यांनी ट्विटरला विकत घेतले होते. तेव्हापासून कधी ट्विटरमधील कर्मचाऱ्यांना अचानक काढून टाकले म्हणून तर कधी लोगो काढून टाकला म्हणून..ट्विटर कायम आंतरराष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तिमध्ये अग्रस्थानी असलेल्या मस्क यांनी रविवारी ट्विटरवरून सर्व युजर्सची जाहीर माफी मागितली आहे.

पर्वत का नमला

ट्विटरच्या मालकाने माफी मागणे ही युजर्सच्या दृष्टीने अतिशय गंभीर गोष्ट आहे. मस्क यांनी २८ मे रोजी सकाळी एक ट्विट केले होते. आतापर्यंत ९२ दशलक्षाहून अधिक ट्विटर युजर्सने हे ट्विट वाचले आहे. तर सात लाखांहून युजर्सने ते लाईक केले आहे. त्यात मस्क म्हणाले की, हे अ‍ॅप अतिशय जागा घेते. त्यासाठी मी तुमची माफी मागतो

इथे ते ट्विट 

व्हॉट्सअ‍ॅप, डिस्कोर्ड या अ‍ॅपच्या तुलनेत ट्विटर तब्बल चार ते साडेचार पट अधिक जागा व्यापते.

(हेही वाचा – व्हॉट्सअ‍ॅपमुळे मैत्री होणार पक्की, येणार आहे ‘हे’ खास फिचर)

तुमच्या मोबाईलची काय स्थिती?

मस्क यांच्या मतानुसार फोनमध्ये सर्वाधिक जागा ट्विटर घेते. तुमच्या फोनमध्ये ट्विटरने किती जागा घेतली आहे, हे शोधणे सोपे आहे.

ट्विटरने तुमच्या मोबाईलमधली किती जागा व्यापली आहे, हे शोधण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा –

  • फोनमधील सेटिंग्सचा पर्याय निवडा
  • तिथे स्टोरेज हा शब्द टाईप करा
  • समोर आलेल्या पर्यायांमधून अ‍ॅप आणि डेटावर क्लिक करा
  • पुढे ट्विटरच्या लोगोवर क्लिक करून ते किती जागा व्यापते आहे हे समजेल

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.