देवेंद्र फडणवीसांनी सोमवारी रात्री उशीरा राज ठाकरेंची घेतली भेट

103
देवेंद्र फडणवीसांनी सोमवारी रात्री उशीरा राज ठाकरेंची घेतली भेट
देवेंद्र फडणवीसांनी सोमवारी रात्री उशीरा राज ठाकरेंची घेतली भेट

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. येत्या सर्व निवडणुका ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार आहे. यामुळे भाजप आणि शिवसेनेसमोर तगडे आव्हान असल्याचे बोलले जात आहे. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री उशीरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्याची समोर आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस सोमवारी रात्री उशीरा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटण्यासाठी शिवतीर्थावर गेले होते. तब्बल सव्वा तास फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा झाली. पण या भेटीमागचे कारण गुलदस्त्यात आहे. मात्र या भेटीमागे आगामी महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे राजकीय समीकरण दडली असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.

(हेही वाचा – पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला झटका; एकमेव आमदाराचा तृणमूलमध्ये प्रवेश)

पाहायला गेले तर भाजप आणि शिवसेनेचे नेते वारंवार राज ठाकरेंच्या संपर्कात आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकांसाठी युतीचे संकेत असल्याचे बोलले जात आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह इतर भाजप नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंसोबत होणाऱ्या भेटीगाठींना महत्त्व प्राप्त होत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.