पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला झटका; एकमेव आमदाराचा तृणमूलमध्ये प्रवेश

85
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला झटका; एकमेव आमदाराचा तृणमूलमध्ये प्रवेश
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला झटका; एकमेव आमदाराचा तृणमूलमध्ये प्रवेश

पश्चिम बंगालच्या सागरदिघी मतदारसंघातील एकमेव काँग्रेस आमदार बायरन बिस्वास यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश केला. टीमसी सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत पश्चिम मेदिनीपूरच्या घाटल येथे आमदार बिस्वास यांनी टीमसीत प्रवेश केला.

काँग्रेसचे एकमेव आमदार पक्षात सहभागी झाल्यानंतर, टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, आमदार बिस्वास पक्षात सहभागी झाले कारण त्यांना वाटले की राज्यात फक्त टीएमसीच भाजपशी लढू शकते. सागरदिघी येथील काँग्रेस आमदार बायरन बिस्वास जोनो संजोग यात्रेत सामील झाले. तृणमूल काँग्रेस परिवारात आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो. भाजपच्या फुटीरतावादी आणि भेदभावाच्या राजकारणाविरुद्ध लढण्यासाठी तुम्ही योग्य व्यासपीठ निवडल्याचे अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले.

(हेही वाचा – चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर कालवश; वयाच्या ४७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

पश्चिम बंगालमधील २०२१च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आपले खातेही उघडू शकली नव्हती. सागरदिघी मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे सुब्रत साहा विजयी झाले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याने सागरदिघी जागेवर मार्च २०२३ मध्ये पोटनिवडणूक झाली. यामध्ये कॉंग्रेसने बिडी व्यावसायिक बायरन बिस्वास यांना तिकीट दिले. त्यांनी टीएमसी उमेदवार देवाशिष बॅनर्जी यांचा २२ हजार ९८६ मतांनी पराभव केला. अशा स्थितीत विधानसभेत काँग्रेसला एक जागा मिळाली होती. सागरदिघी ही जागा काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधिरंजन चौधरी यांच्या मतदारसंघात येत असल्यामुळे काँग्रेससाठी अतिशय महत्त्वाची सीट होती. आणि बायरन यांनी ज्या देवाशिष यांना पराभूत केले होते, ते देखील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे दूरचे नातेवाईक होते. पण बायरन यांनी निवडणूक जिंकल्यापासून ते टीएमसीमध्ये जातील असे बोलले जात होते आणि अखेर तेच घडले. आता पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस आमदारांची संख्या शून्य झाली आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या विजयानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मकला दर्शविली होती. ममता म्हणाल्या होत्या की, ज्या राज्यांमध्ये ते (काँग्रेस) मजबूत आहेत तेथे टीएमसी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार आहे. याशिवाय बंगालसारख्या राज्यात काँग्रेसला टीएमसीला मदत करावी लागेल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.