Health Tips : कोमट पाण्यात तूप मिसळून प्या, होतील अनेक आरोग्यदायी फायदे

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, योग्य प्रमाणात तुपाचे सेवन केल्यास शरीराचे वजन कमी व्हायला मदत होते.

219
Health Tips : कोमट पाण्यात तूप मिसळून प्या, होतील अनेक आरोग्यदायी फायदे
Health Tips : कोमट पाण्यात तूप मिसळून प्या, होतील अनेक आरोग्यदायी फायदे

तुपात अनेक औषधी घटक असतात. कोमट पाण्यात एक चमचा तूप मिसळून प्यायल्यास विविध आरोग्यदायी फायदे होतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, योग्य प्रमाणात तुपाचे सेवन केल्यास शरीराचे वजन कमी व्हायला मदत होते. त्वचा आणि शरीराच्या पचनसंस्थेसाठीही तूप आवश्यक आहे. याशिवाय इतरही फायदे होतात.

तुपामध्ये कॅल्शियम, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, हेल्दी फॅट्स, जीवनसत्त्व ए, जीवनसत्त्व डी, ई आणि के यासारख्या पोषणतत्त्वांचा साठा असतो. यामुळे शरीरास नैसर्गिक स्वरुपात ओलावा मिळतो.

(हेही वाचा – Ajit Pawar : शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणारे काम अधिकाऱ्यांनी करावे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा)

  • कोमट पाण्यात तूप मिसळून प्यायल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. अन्नाचे पचनही सहजरित्या होते. पचनसंस्था सुधारते.
  • तुपामध्ये नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझरचे गुणधर्म असतात. यामुळे शरीर आतून स्वच्छ व्हायला मदत होते. कोमट पाण्यात तूप मिसळून प्यायल्यास आतड्या स्वच्छ होतात. शरीराच्या पचनसंस्थेचं कार्य सुरळीत सुरू राहतं.
  • शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यासही मदत होते. कोमट पाण्यात तूप मिसळून प्यायल्याने शरीरातील विषारी घटक सहज बाहेर फेकले जातात. यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊन चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारून ह्रदय निरोगी राहते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.