Ajit Pawar : शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणारे काम अधिकाऱ्यांनी करावे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा

पिंपरी-चिंचवड येथील गणेश मंडळांनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली

68
Ajit Pawar : शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणारे काम अधिकाऱ्यांनी करावे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा
Ajit Pawar : शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणारे काम अधिकाऱ्यांनी करावे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा

शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणारे काम अधिकाऱ्यांनी करावे, अशी अपेक्षा अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली. त्यांनी आज झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण निगडी येथील शरदनगर आणि दुर्गानगरच्या ६७० झोपडीधारक पुनर्वसन प्रकल्पाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

सदनिकांतील सुविधा, सौर ऊर्जेची व्यवस्था, इमारतीची सुरक्षा, देखभाल आणि स्वच्छता, परिसरातील वृक्षारोपण, जलपुनर्भरण आदींविषयी माहिती घेतली. इमारत परिसरात स्वच्छता राखावी, प्रकल्पातील सेवांसाठी स्थानिकांना संधी द्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. याविषयी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी माहिती दिली.

(हेही वाचा-Veer Savarkar : पुण्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ऐतिहासिक उडीचा देखावा; मंजिरी मराठे, सात्यकी सावरकर यांच्या हस्ते उद्घाटन)

यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दोन झोपडीधारकांना सदनिकांचे हस्तांतरण करण्यात आले. इमारतीत चांगल्या सुविधा देण्यात आल्या असून त्यांचा व्यवस्थित वापर करावा. घर तसेच परिसरही स्वच्छ आणि सुंदर राहिल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले तसेच मेट्रो सुविधा निगडीपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

पिंपरी-चिंचवड येथील गणेश मंडळांनाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भेट दिली तसेच श्री मोरया गोसावी यांनी समाधी मंदिराला भेट देऊन समाधीचे दर्शन घेऊन गणपतीची आरती केली.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.