Dhanteras : धनत्रयोदशीला कोणत्या वस्तूंची खरेदी कराल, जाणून घ्या…

138
Dhanteras : धनत्रयोदशीला कोणत्या वस्तूंची खरेदी कराल, जाणून घ्या...
Dhanteras : धनत्रयोदशीला कोणत्या वस्तूंची खरेदी कराल, जाणून घ्या...

हिंदू धर्मात धनलक्ष्मीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी ! या दिवसाला धनतेरस असेही म्हणतात. व्यापारी, सोनार आणि शेतकरी या सणाला विशेष महत्त्व देतात. धनत्रयोदशीपर्यंत कापणीचा हंगाम ओसलेला असतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या खळ्यात धान्याच्या राशी असतात. शेतकऱ्यांसाठी धान्य हेच धन, तर व्यापारी आणि व्यावसायिक यांनी कमावलेलं धन अर्थात पैसा या दोन्ही अर्थाने धनाची पूजा धनत्रयोदशीच्या (Dhanteras) दिवशी केली जाते.

धनत्रयोदशी साजरी करण्याची पद्धत धन्वंतरीच्या स्मृतीप्रीत्यर्थ सुरू झाली, असं शास्त्रात सांगितलं जातं. या दिवशी धणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. घरातील धनधान्याची पूजा करून उत्तर आरोग्य आणि धनसंपदा राखावी यासाठी प्रार्थना केली जाते. या दिवशी अनेक जण आवर्जून सोन्या-चांदीच्या वस्तूंच्या खरेदीसोबतच इलेक्ट्रिक वस्तूंचीही खरेदी करतात. त्याचप्रमाणे या दिवशी नेमकं काय खरेदी करायला हवं, याविषयी सविस्तर माहिती पाहूया.

(हेही वाचा – Amarnath Yatra: आता अमरनाथ यात्रेला कारने जाता येणार, बीआरओकडून रस्तारुंदीकरणाचे काम पूर्ण )

– ‘पितळ’ या धातूला धन्वंतरीचा धातू मानले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी समुद्र मंथन होत असताना भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकटले होते. यामुळे या दिवशी पितळेची भांडी किंवा वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते. पितळी वस्तूंची खरेदी केल्यास घरात आरोग्य, सौभाग्य आणि संपन्नता नांदते, असे मानण्याची प्रथा आहे.

– या दिवशी चांदीच्या वस्तू किंवा दागिन्यांची ग्राहक आवर्जून खरेदी करतात. यामुळे धन, धान्य आणि समृद्धी वाढीचे हे प्रतिक आहे. लक्ष्मीची अखंड कृपा होण्यासाठी चांदी खरेदीला धनत्रयोदशीच्या दिवशी महत्त्व आहे. काही जण गणपती किंवा लक्ष्मीची चांदीची मूर्ती या दिवशी खरेदी करतात.

– धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेराची प्रतिमा घरी आणली जाते. भगवान कुबेराची प्रतिमा उत्तर दिशेला स्थानापन्न करून त्याची मनोभावे पूजा करतात. उद्योगात भरभराट होण्यासाठी व्यापारी, व्यावसायिक कुबेराची प्रतिमा आणतात.

– शंख खरेदी करणेही या दिवशी शुभ मानले जाते. घरात देव्हाऱ्यात शंख ठेवून तो रोज वाजवल्यास संकट टळतं. या मान्यतेमुळे या दिवशी शंख खरेदी केला जातो.

– लक्ष्मीदेवीला कवड्या आवडतात, म्हणून काही जण या दिवशी कवड्याही विकत घेतात. कवड्या लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवल्यास पैशांची कधीही कमतरता राहात नाही, याकरिता याकरिता धनतेरसच्या दिवशी कवड्या खरेदी केल्या जातात.

(हेही वाचा –ब्रिटिशांकडे कायद्यात बदल करण्याची मागणी करणारे महान क्रांतिकारक Surendranath Banerjee )

– झाडूला हिंदू धर्मात लक्ष्मीदेवीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे घरातील नैराश्य आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यासाठी झाडूची खरेदी करणेही शुभ मानले जाते.

अख्खे धणे…

अख्खे धणे हे समृद्धी आणि निरोगी आरोग्याचं प्रतीक आहे. याकिरता धनतेरसच्या दिवशी अख्ख्या धण्यांची खरेदी केली जाते. अख्खे धणे विकत घेऊन ते बागेत किंवा कुंडीत पेरावेत. त्याला रोज पाणी घालून त्याची काळजी घ्यावी.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.