ब्रिटिशांकडे कायद्यात बदल करण्याची मागणी करणारे महान क्रांतिकारक Surendranath Banerjee

185

सुरेंद्रनाथ बॅनर्जी (Surendranath Banerjee) हे भारताचे महान स्वातंत्र्यसैनिक आणि मुत्सद्दी नेते होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय संघ ही भारतातील सर्वात जुनी राजकीय संघटना स्थापन केली होती. त्याचबरोबर त्यांना दोनदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला आहे. त्यांना राष्ट्रगुरु म्हणूनही ओळखले जाते. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आवाज उठवला आणि देशाच्या हितासाठी कायद्यात बदल करण्याची मागणी केली होती.

सुरेंद्रनाथ बॅनर्जी (Surendranath Banerjee) यांचा जन्म १० नोव्हेंबर १८४८ रोजी कोलकाता, पश्चिम बंगाल येथे झाला. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे वडील प्रसिद्ध डॉक्टर होते. कलकत्ता विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदवी प्राप्त केल्यानंतर बॅनर्जी भारतीय नागरी सेवा परीक्षा पूर्ण करण्यासाठी इंग्लंडला गेले. त्यांना तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला, मात्र बॅनर्जी यांनी यशस्वीपणे परीक्षा उत्तीर्ण केली.

सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची सिल्हेटमध्ये सहाय्यक दंडाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती परंतु जातीय भेदभावामुळे त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले होते. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे असहाय देशवासियांना समान वागणूक न मिळाल्यामुळे त्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि विरोध करण्यासाठी लंडनला गेले होते.

(हेही वाचा Unseasonal Rain : ऐन दिवाळीत मुंबईसह कल्याण-डोंबिवलीत पाऊस)

लंडनमधील त्यांच्या वास्तव्यादरम्यान, सुरेंद्रनाथ बॅनर्जी (Surendranath Banerjee) यांनी पश्चिमेकडील महान उदारमतवादी विचारवंतांच्या लेखनासह विविध विषयांचा सखोल अभ्यास केला. ते उदारमतवादी राजकारणी तर होतेच त्याचबरोबर एक चांगले शिक्षणतज्ज्ञ आणि नामांकित शिक्षकही होते.

सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी ‘बंगाली’ नावाचे इंग्रजी वृत्तपत्र प्रकाशित केले, ज्याद्वारे त्यांनी उदारमतवादी विचार आणि राष्ट्रवादी संदेश लोकांमध्ये पसरवला. १९७६ मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्र संघाची स्थापना केली. मात्र नंतर काँग्रेससोबत गेले. कारण दोन्ही संस्थेची तत्त्वे आणि उद्दिष्टे समान होती. पुढे १८९५ आणि १९०५ मध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी काँग्रेसचे अध्यक्ष झाले.

त्यांनी बंगालच्या फाळणीला कडाडून विरोध केला आणि ब्रिटिशांना बंगालच्या फाळणीचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडले, म्हणून त्यांना किंग ऑफ बंगाल (बंगालचा राजा) आणि बंगालचा निर्माता म्हणूनही ओळखले जाते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.