Apple पाठोपाठ ‘ही’ कंपनीसुद्धा भारतात स्टोअर्स सुरू करण्याच्या तयारीत

परदेशी कंपन्या भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखतात. २०२० साली स्थापन झालेल्या नथिंग या कंपनीने १२ जुलै २०२२ ला पहिला फोन बाजारात आणला होता.

228
Apple store

वीस – पंचवीस देशांच्या जीडीपीपेक्षा श्रीमंत असलेली बलाढ्य कंपनी म्हणजे अ‍ॅपल (Apple). लोकांच्या आग्रहाखातर काही दिवसांपूर्वी Apple या कंपनीने भारतात रिटेल स्टोअर सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाला देशभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अ‍ॅपलने भारतातले पहिले रिटेल स्टोअर मुंबईत उघडले तर दुसरे स्टोअर देशाच्या राजधानीत उघडले. आता अ‍ॅपलच्या पाठोपाठ आणखी एक परदेशी मोबाईल कंपनी भारतात स्टोअर उघडण्याच्या तयारीत आहे.

( हेही वाचा : Operation Kaveri : ‘ऑपरेशन कावेरी’! सुदानमधून पहिली तुकडी भारतात दाखल)

Apple पाठोपाठ आणखी एक कंपनी भारतात येणार

वेगळ्या डिजाईनमुळे कमी काळात ग्राहकांपर्यंत पोहोचलेली कंपनी म्हणजे नथिंग. नथिंगचा पहिला फोन ‘ट्रान्सफरंट फोन’ म्हणून प्रसिद्ध झाला होता. ही कंपनी भारतात स्टोअर उघडण्याच्या विचारात आहे. नथिंग इंडियाचे उपाध्यक्ष आणि जनरल मॅनेजर मनू शर्मा यांनी सांगितले की, कंपनी यावर्षी आपला दुसरा स्मार्टफोन म्हणजेच ‘नथिंग फोन २’ लॉंच करणार आहे.

परदेशी कंपन्या भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखतात. २०२० साली स्थापन झालेल्या नथिंग या कंपनीने १२ जुलै २०२२ ला पहिला फोन बाजारात आणला होता. तेव्हापासून कंपनीने दुसरा कोणताही फोन लॉंच केलेला नाही. कंपनीच्या या पहिल्या मोबाईलला फ्लिपकार्टवर पूर्वी ४.२ इतके रेटिंग होते. आता त्यात सुधारणा होऊन ४.४ झाले आहे.

कधी उघडणार स्टोअर?

मनू शर्मा यांनी सांगितले की सध्या देशातील २,००० पेक्षा जास्त स्टोअर्समध्ये कंपनीचा स्मार्टफोन उपलब्ध आहे. पुढील वर्षी देशात रिटेल स्टोअर उघडण्याचा कंपनीचा विचार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.