Operation Kaveri : ‘ऑपरेशन कावेरी’! सुदानमधून पहिली तुकडी भारतात दाखल

सुदानमध्ये अडकलेल्या सुमारे तीन हजार भारतीयांच्या सुटकेसाठी ऑपरेशन कावेरी (Operation Kaveri) सुरू करण्यात आले आहे. सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना आधी जहाजाने सौदीची राजधानी जेहादमध्ये आणावे लागते. त्यानंतर जेहादमधून हवाई मार्गाने भारतात आणले जाते. आतापर्यत पाच तुकड्यांमध्ये एकूण ९६७ भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात आले आहे.

172
Operation Kaveri

लष्कर व निमलष्कर दल यांच्यातील सशस्त्र संघर्षामध्ये संपूर्ण सुदान होरपळून निघत आहे. सुदानमध्ये काही भारतीय सुद्धा अडकले होते. त्यापैकी ३६० जणांना ऑपरेशन कावेरी अंतर्गत बुधवारी रात्री नवी दिल्ली येथील विमानतळावर दाखल करण्यात आले.

( हेही वाचा : IPL 2023 : ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठी रंगतेय चुरस! टॉप ५ खेळाडू कोण आहेत वाचा…)

ऑपरेशन कावेरी (Operation Kaveri) नेमके काय ?

सुदानमध्ये अडकलेल्या सुमारे तीन हजार भारतीयांच्या सुटकेसाठी ऑपरेशन कावेरी (Operation Kaveri) सुरू करण्यात आले आहे. सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना आधी जहाजाने सौदीची राजधानी जेहादमध्ये आणावे लागते. त्यानंतर जेहादमधून हवाई मार्गाने भारतात आणले जाते. आतापर्यत पाच तुकड्यांमध्ये एकूण ९६७ भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात आले आहे. सर्व देशांच्या नागरिकांना मायदेशी नेता यावे म्हणून सुदानमध्ये तीन दिवस युद्धबंदी घोषित करण्यात आली आहे.

पहिल्या तुकडीत २७८ भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इथे बॉम्ब हल्ले केले जात आहेत. या संघर्षात ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच तीव्र उन्हामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. सुदान सरकारशी संपर्क साधून भारताने ऑपरेशन कावेरी (Operation Kaveri) सुरू केले आहे. पुढील काही दिवसांत सर्व भारतीय नागरिकांना सुखरूप परत आणण्यात येणार आहे.

( हेही वाचा : Indian Railway : तुमच्या कन्फर्म रेल्वे तिकिटावर दुसऱ्या व्यक्तीला करता येणार प्रवास! जाणून घ्या ‘ही’ सोपी प्रक्रिया…)

या ऑपरेशनच्या पहिल्या टप्प्यात सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची पाचवी तुकडी INS TEG 297 प्रवाशांसह सुदानहून रवाना झाली आहे. याबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट केले की, सुदानमधून सुखरूप आणलेल्या भारतीयांची ही पाचवी तुकडी आहे. अरिंदम बागची यांनी ट्विट केले आहे की, “#ऑपरेशन कावेरी (Operation Kaveri) सुरूच आहे. संघर्षग्रस्त सुदानमधून आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी भारताने सोमवारी ऑपरेशन कावेरी सुरू केले.”

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.