Slogan On Education: शैक्षणिक घोषवाक्यांद्वारे विद्यार्थ्यांचा विकास कसा होतो? जाणून घ्या…

256
Slogan On Education: शैक्षणिक घोषवाक्यांद्वारे विद्यार्थ्यांचा विकास कसा होतो? जाणून घ्या...
Slogan On Education: शैक्षणिक घोषवाक्यांद्वारे विद्यार्थ्यांचा विकास कसा होतो? जाणून घ्या...

झाडे लावा- झाडे जगवा, स्वच्छता पाळा -रोगराई टाळा, एक, दोन, तीन, चार स्वातंत्र्याचा जयजयकार, ज्ञाना दिवा – लावा घरोघरी, मुलगा मुलगी एकसमान दोघांनाही शिकवू छान, भारतीय स्वातंत्र्यदिन -चिरायू होवो, जय जवान – जय किसान, जय विज्ञान, झाडे वाढवा-चैतन्य फुलवा, स्वच्छता ठेवा- आजार पळवा, पाण्याविना नाही प्राण, पाण्याचे तू महत्त्व जाण, माझी शाळा सुंदर शाळा, सुंदर छान माझी शाळा, गावाचा अभिमान माझी शाळा!, मला जायचंय शाळेला, नवं काहीतरी शोधायला…! सावित्री ताराराणीचा वसा मला चालवू दे…! (Slogan On Education)

अशी एक ना अनेक घोषवाक्ये आपण ऐकतो. शाळेतल्या मुलांना शिक्षणाची, स्वच्छतेची, चांगल्या सवयींची गोडी लागावी याकरिता ही घोषवाक्ये तयार केली आहेत. साध्या, सोप्या भाषेतील घोषवाक्ये मुलांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देतातच शिवाय आरोग्य, स्वच्छतेच्या सवयींचे महत्त्वही मुलांच्या मनावर बिंबवण्यास मदत करतात. घोषवाक्यांमुळे शिक्षणाचे महत्त्व, शिक्षणाचे सार मुलांपर्यंत सहज पोहोचते. ही घोषवाक्ये मुलांकरिता प्रेरणादायी ठरतात.

(हेही वाचा – Ind vs Eng Test Match : भारताचा इंग्लंडवर ५ विकेट्सने विजय; ३ – १ ने मालिकाही खिशात)

आकर्षक आणि प्रेरणादायी शैक्षणिक घोषवाक्ये –
शिक्षणः उज्ज्वल भविष्यासाठी पारपत्र.
मनाची शिक्षणाच्या सामर्थ्याने उजळणी करा.
शिक्षण हे जग बदलण्याचे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.
शिक्षण: तुमची क्षमता खुली करण्याची गुरुकिल्ली.
ज्ञान ही शक्ती आहे, शिक्षण हा त्याचा स्रोत आहे.
शिक्षणः अमर्याद शक्यतांसाठी दरवाजे उघडणे.
शिक्षणः चांगल्या समाजाचा पाया.
शिक्षणः भविष्याला आकार देते.
माणसाला शिक्षण द्या. तो एक नवीन जग तयार करेल.
शिक्षण ही उत्तर भेटवस्तू आहे, जी दुसऱ्यालाही देऊ शकता.
शिक्षणः प्रगतीचा पाया.
शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली आहे.
शिक्षणाशिवाय विकास होत नाही.
ज्ञान ही अशी संपत्ती आहे जी चोरली जाऊ शकत नाही.
शिक्षणः उज्ज्वल भविष्याची शिडी.
जीवन हा सर्वोत्तम शिक्षक आहे; शिक्षण आपल्याला त्याचे धडे समजून घेण्यास मदत करते.

शैक्षणिक घोषवाक्यांचे फायदे – 

शिक्षणाचे महत्त्व पटवणारी घोषवाक्ये फक्त मुलांसाठीच नाही, तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही उपयुक्त ठरतात. एखाद्या विशिष्ट विषयाचे ज्ञान, मूल्ये, कौशल्ये संपादन करण्यासाठी घोषवाक्यांची सहज मदत होते. मुलांना समाज आणि आपल्या सभोवतालच्या जगाबद्दल ज्ञान होते. मुलांचे व्यक्तिमत्त्व सुधारण्यास, बौद्धिक विकास होण्यास शैक्षिणक घोषवाक्यांची मदत होते. घोषवाक्यांचा मुलांवर सकारात्मक परिणाम होतो. भाषाविकासाबरोबरच ज्ञानही मिळते. लिहिण्या-वाचण्याची क्षमता वाढते. आत्मविश्वास वाढतो.

घोषवाक्यांचा विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम…
मुलं जेव्हा ही घोषवाक्ये म्हणतात तेव्हा नकळत त्यांच्या मन, बुद्धिवर चांगले संस्कार होऊन योग्य कृती होण्यासही मदत होते. मुले स्वत: शिकलेल्या चांगल्या सवयी जेव्हा कृतीत आणतात. तेव्हा चांगले संस्कार त्यांच्यावर होतातच. यामुळे कृतिशील, सकारात्मक दृष्टिकोन असणारी पिढी समाजात विकसित व्हायला मदत होते. याकरिता  घोषवाक्यांद्वारे विद्यार्थ्यांना सहज शिकता यावे, याकरिता शाळाशाळांमध्ये काही शैक्षणिक घोषवाक्ये शिक्षक तयार करतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.