Indian Navy : भारतीय नौदलाला लवकरच मिळणार एआय कमांडर, चीनचे होणार गर्वहरण

102
भारतीय नौदलाला लवकरच मिळणार एआय कमांडर, चीनचे होणार गर्वहरण
भारतीय नौदलाला लवकरच मिळणार एआय कमांडर, चीनचे होणार गर्वहरण

जगातील सर्वात मोठी नौदल शक्ती आपल्याकडे आहे, असे म्हणवणाऱ्या चीनचे आता लवकरच गर्वहरण होणार आहे, कारण भारतीय नौदलाकडून लवकरच भारताच्या शौर्याचे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे रुपांतर (AI) युग ‘ब्लू झोनमध्ये करण्यावर भर दिला जाणार आहे. नौदलाकडून आपल्या भविष्यकालिन प्रकल्पांसाठी प्रत्येक युद्धनौकेला नवीन “एआय कमांडर” मिळणार आहे. या कमांडरचे वैशिष्ट्य म्हणजे तो अचूक आकडेमोड करेल आणि शत्रूचा सामना करायचा आणि कधी कोणत्या शस्त्राने हल्ला करायचा, हे सांगेल.

यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, आता तंत्रज्ञान जीवनावश्यक आहे. आपण ते टाळू शकत नाही. आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात प्रवेश करत आहोत आणि ते बळकट केले पाहिजे. आता नौदल पंतप्रधान मोदींनी सांगितलेल्या गोष्टीची अंमलबजावणी करत आहे. भारतीय नौदलाला अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे आता नौदल एआयने सुसज्ज असेल.

(हेही वाचा – Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकात ध्वजारोहण)

नवीन संरक्षण इकोसिस्टम विकसित

भारतीय नौदलाने नवीन संरक्षण इकोसिस्टम विकसित केली आहे. ही संरक्षण इकोसिस्टिम स्वावलंबी आणि आधुनिक आहे शिवाय ती मानवी बुद्धिमत्तेबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज आहे. शत्रूच्या हल्ल्याला प्रत्युत्तर कसे द्यायचे, विशिष्ट परिस्थितीत कोणते शस्त्र शत्रूविरुद्ध सर्वात मारक ठरेल, रॉकेट कधी लॉंच करायचे, क्षेपणास्त्रे कधी डागायची शत्रूच्या पाणबुड्या आणि जहाजे टॉपर्डेने कधी नष्ट करायची, या सर्व प्रश्नांची उत्तरे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स देऊ शकणार आहे.

प्रत्येक युद्धनौका आधुनिक एआय प्रणालींसह सज्ज…
भविष्यातील युद्धांसाठी सज्ज होणारे भारतीय नौदल एका मोठ्या योजनेवर काम करत आहे. भविष्यातील युद्धाच्या तयारीसाठी भारतीय नौदल सायबर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बिग डेटा अनालिटिक्स यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पूर्ण क्षमतेने वापर करत आहे. या मेगा प्लॅननुसार भारतीय नौदलाची प्रत्येक युद्धनौका आधुनिक एआय प्रणालींसह सज्ज केली जाणार आहे.

हेही पहा  – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.